मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-84-गप्पा गणितज्ञाशी !

Started by Atul Kaviraje, January 30, 2023, 09:22:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-84
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी !"

                                 गप्पा गणितज्ञाशी ! --
                                -----------------

"अशा प्रकारे ती महिला एखादा अद्भुत खजिना सापडल्यासारखे बुटाला कवटाळते.
याच प्रमाणे आयुर्वेद औषधांच्या प्रचाराचासुद्धा उबग येतो. अशा जाहिरातीवर बंदी का नाही?"
"ते शक्य नाही. कारण टीव्ही चॅनेल्सचे अर्थकारण अशा जाहिरातीवर अवलंबून आहे."

"जाऊ द्या हो.... माझ्यासाठी काही किस्से आहेत का?"

किस्सा 1--

एका आर्मी युनिटच्या कमांडरच्या बायकोनी जीव विमा कंपनीची एजन्सी घेतली. कमांडरची बायको असल्यामुळे युनिटच्या प्रत्येक रिक्रूटकडे जाऊन जीव विमा उतरवा... त्याचे अमुक अमुक फायदे असे काही ती सांगणार नव्हती. त्यामुळे कमांडंटनी हे काम सुभेदार मेजरकडे सोपविले. त्यानी हाताखालील 4 -5 सुभेदारांना बोलवून कोटा पूर्ण करण्याची ऑर्डर दिली. जास्तीत जास्त शिपायांनी विमा उतरविला पाहिजे असे फर्मान सोडले. एका सुभेदाराचा अपवाद वगळता इतरांची क्षमता अत्यंत सुमार होती. मात्र एका सुभेदाराने भरपूर शिपायांकडून विमा उतरविण्यास भाग पाडले. कमांडंट आश्चर्यचकित होत याचे रहस्य काय म्हणून त्या सुभेदाराला विचारले.
काही विशेष नाही सर, मी त्या शिपायांना तुम्ही युद्धात वीर मरण पावल्यास सरकार तुमच्या कुटुंबाला एक लाख रुपये देते. परंतु तुम्ही हा विमा उतरविल्यास व युद्धात मृत्यु आल्यास सरकारला अडीच लाख रुपये द्यावे लागणार. यातून सरकारचे भरपूर नुकसान होणार. त्यामुळे कदाचित अशा विमाधारकांना फ्रंटवर पाठविणार नाहीत असे सांगत होतो. त्यामुळे ते पटापट विम्याचा पहिला हप्ता देवू लागले.

"तर्कशुद्ध फसवणूक, छान..." डॉक्टर आचार्य.

किस्सा 2--

टीव्हीवर एका मानसोपचार केंद्राची जाहिरात वरचेवर झळकत होती. विषयानुसार ज्ञानवर्धक गोळ्या! अमुक गोळी घेतल्यास अमुक विषयावरील एकूण एक ज्ञान मेंदूत जाऊन तुम्ही त्या विषयाच्या कुठल्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देवू शकता. ....

--प्रभाकर नानावटी
(February 28, 2013)
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.01.2023-सोमवार.
=========================================