क्षणावर एक अगम्य कविता-गीत-माझ्या डोळयाला डोळा नाही, ही रात्र कशी सरतंच नाही !

Started by Atul Kaviraje, January 30, 2023, 10:06:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, क्षणावर एक अगम्य कविता-गीत ऐकवितो. "जाने क्या सोचकर नहीं गुज़रा, इक पल रात भर नहीं गुज़रा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(जाने क्या सोचकर नहीं गुज़रा, इक पल रात भर नहीं गुज़रा)
--------------------------------------------------------------------

                "माझ्या डोळयाला डोळा नाही, ही रात्र कशी सरतंच नाही !"
               ----------------------------------------------------

माझ्या डोळयाला डोळा नाही,
ही रात्र कशी सरतंच नाही !

माझ्या डोळयाला डोळा नाही,
ही रात्र कशी सरतंच नाही !
माझ्या मनाला चैन नाही,
हा क्षणच पुढे सरकत नाही !

मी आणि माझं एकलेपण
दोघेही हाती हात घालून चालतोय
कुणाकडे करावी तक्रार याची ?
जो तो इथे साथीदार शोधतोय.

हा प्रवास कसा सरतंच नाही
हा रस्ता पुढे जातच नाही
मी इथल्याइथेच कसा घूटमळतोय,
माझ्या पावलांना अंदाजच येत नाही.

जीवन हे पळभर असतं म्हटलंय कुणी
जीवन हे क्षणभर असतं म्हटलंय कुणी
कधी हा क्षणच सरकत नाही पुढे,
कधी ही वेळच जात नाही पुढे.

कुणी भेटेल प्रवासात घडी दोन घडी
कुणी येईल जीवनात घडी दोन घडी
हा क्षणिक प्रवास इथेच संपला,
या प्रवासाचे काहीच महत्त्व नाही.

हा क्षण का थांबलाय उमजत नाही
हा काळ का थमलाय समजतं नाही
हा क्षण कधी सरेल ?
हा प्रवास कधी संपेल ?

माझ्या डोळयाला डोळा नाही,
ही रात्र कशी सरतंच नाही !

माझ्या डोळयाला डोळा नाही,
ही रात्र कशी सरतंच नाही !
माझ्या मनाला चैन नाही,
हा क्षणच पुढे सरकत नाही !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.01.2023-सोमवार.
=========================================