जीवनावर गूढ कविता-गीत-जीवन हे असंच असतं, हवं ते कधीच मिळत नसतं !

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 04:23:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक,  जीवनावर गूढ कविता-गीत ऐकवितो. "आदमी जो सुनता है, आदमी जो कहता है, ज़िंदगी भर वो सदायें पीछा करती हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मंगळवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(आदमी जो सुनता है, आदमी जो कहता है, ज़िंदगी भर वो सदायें पीछा करती हैं)
------------------------------------------------------------------------

                    "जीवन हे असंच असतं, हवं ते कधीच मिळत नसतं !"
                   -----------------------------------------------

जीवन हे असंच असतं,
हवं ते कधीच मिळत नसतं !

जीवन हे असंच असतं,
हवं ते कधीच मिळत नसतं !
आकांक्षा असते सर्व मिळण्याची,
अपिक्षलेलं केव्हाच प्राप्त होत नसतं.

माणसाने आता विचार करणंच सोडलंय
गप्प राहण्यातच धन्यता मानलीय
बोलून जर काही मिळत नसेल,
म्हणून तर त्याने चुप्पी साधलीय.

आजवर त्याच्या कानी जे पडलंय
आजवर त्याने जे म्हटलंय
तेच पुढे पाठलाग करीत राहत,
तेच पुढे त्याला आठवत राहत.

आजवर त्याने जे कर्म केलंय
आजवर त्याने जे दान दिलंय
त्यांचI त्याला आयुष्यभर दुवा मिळतो,
त्याचं त्याला जीवनभर समाधान मिळत.

प्रत्येक स्वप्न सुंदर निघेल कधी ?
प्रत्येक स्वप्न दुःस्वप्नही असतं कधी
स्वप्नाच्या राज्यात रमायचं नसतं,
हकीकतमध्येही कधी राहायचं असतं.

अति प्रेमही ठरतं कधी बाधक
अति जवळीकही नसते साधक
जास्त लगावही ठरतो त्रासदायक,
अति परिचयात होते अवज्ञाही.

प्रेमावर जास्त विश्वासही नाही चांगला
भरवसा तर कधीही नाही भला
मग माघार घेण्यास होतो त्रास,
प्रेमभंग घेतो प्रेमाचा ग्रास.

ते प्रेम जरी नाही टिकलं
ते नातं जरी नाही दुभंगलं
तरी कर्म आयुष्यभर पिच्छा करत,
जीवनभर तुम्हाला ते आठवत राहत.

कधी उन्हाचा चटका सहावा लागतो
कधी मनःस्ताप सहन करावा लागतो
कधी पावसाच्या शीत धारा बरसतात,
मनास मग त्या शांत करीत राहतात.

इतकं असूनही तहान कधीच नाही भागत
पिण्यास एक थेम्ब पाणीही नाही लाभत
हे ढग बरसत असेच निघून जातात,
मनास ते तहानलेलच ठेवून जातात.

जीवन हे असंच असतं,
हवं ते कधीच मिळत नसतं !

जीवन हे असंच असतं,
हवं ते कधीच मिळत नसतं !
आकांक्षा असते सर्व मिळण्याची,
अपिक्षलेलं केव्हाच प्राप्त होत नसतं.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================