जीवनावर कविता-गीत-जीवनाला मी जवळून पाहिलंय, जीवनाला मी चांगलं ओळखलंय !

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 04:52:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवनावर कविता-गीत ऐकवितो. "देखा है ज़िन्दगी को, कुछ इतना करीब से"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मंगळवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(देखा है ज़िन्दगी को, कुछ इतना करीब से)
------------------------------------------------------

            "जीवनाला मी जवळून पाहिलंय, जीवनाला मी चांगलं ओळखलंय !"
           ----------------------------------------------------------

जीवनाला मी जवळून पाहिलंय,
जीवनाला मी चांगलं ओळखलंय !

जीवनाला मी जवळून पाहिलंय,
जीवनाला मी चांगलं ओळखलंय !
जवळचा होऊ लागलाय आज परका,
आपलाच तोंड फिरवतोय सारखा.

त्यांचं वागणं विचित्र वाटू लागलंय
त्याचं बोलणं मला टोचू लागलंय
सर्व चेहऱ्याचे आज मुखवटे झालेत,
त्यात माझा चेहराही हरवून गेलाय.

माझ्या मनातल्या गोष्टी मनातच होत्या
मी त्या कुणास सांगितल्याही नव्हत्या
शोधता शोधता मला सापडले कुणी,
त्याचं त्याला मी वदल्या होत्या.

बोली लावत होते सारे लिलावाची
ऐट दाखवत होते सारे श्रीमंतीची
इथे गरिबाला कुणी विचारतं नव्हते,
त्याच्या गरिबीची थट्टा करीत होते.

उपकाराची फेड येथे अपकाराने होतेय
प्रेतावरले येथे कफन ओढले जातेय
माणूसच माणसाचा येथे शत्रू होतोय,
माणुसकी येथे पायदळी तुडवली जातेय.

जीवनाला मी जवळून पाहिलंय,
जीवनाला मी चांगलं ओळखलंय !

जीवनाला मी जवळून पाहिलंय,
जीवनाला मी चांगलंचं ओळखलंय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================