विठ्ठल-भक्ती-गीत-क्षेत्र पंढरपुरी आपण जाऊया, पांडुरंगाचे दर्शन घेऊ या

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 11:37:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार-दिनांक-०१.०२.२०२३. त्या पांडुरंगाचे, त्या सावळ्या ईश्वराचे, रखुमाई संगे दर्शन घेऊया, आणि ऐकुया एक भक्ती-गीत. "माझी वादळात सापडली नाव रे, दूर किनारी हाय माझा गाव रे", या लोक-गीतावर हे भक्ती-गीत आधारित आहे. या भक्ती-गाण्याचे  शीर्षक आहे- "क्षेत्र पंढरपुरी आपण जाऊया, पांडुरंगाचे दर्शन घेऊ या"

                   "क्षेत्र पंढरपुरी आपण जाऊया, पांडुरंगाचे दर्शन घेऊ या"
                  -------------------------------------------------

क्षेत्र पंढरपुरी आपण जाऊया,
पांडुरंगाचे दर्शन घेऊया
चंद्रभागेत आंघोळ करूया,
साऱ्या पापांचे क्षालन करूया.

     देव पंढरी भक्तीचे माहेर
     तेथे वसतोय रखुमाईचा वर
     सावळ मूर्तीचे रूप ते मनोहर,
     भक्तिभावाने त्यास हो वंदूया.

आषाढी, कार्तिकी वIरीलI जाऊया
दिंडी यात्रेचा अनुभव घेऊया
विठ्ठल नामाचा गजर करूनी,
रूप डोळा भरुनी पाहूया.

     पांडुरंगाचे धाम ही पंढरी
     युगे अठ्ठावीस उभा विटेवरी
     पुंडलिकाची भेट या श्रीहरी,
     त्या वीटेशी मस्तक ठेवूया.

गळा तुळशीमाळ, कानात कुंडले
वस्त्र पितांबरी, रूप हे शोभले
हात कटेवरी, सIन ती पाऊले,
त्या पावलांचे आशिष घेऊया.

     क्षेत्र पंढरपुरी आपण जाऊया
     त्या सावळ्याची दृष्ट हो काढूया
     विठ्ठल नामाचा गजर करूनी,
     टाळ मृदूंगात तल्लीन होऊया.

क्षेत्र पंढरपुरी आपण जाऊया,
पांडुरंगाचे दर्शन घेऊ या.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.   
=========================================