जीवनावरील एक कविता-गीत-जीवनात प्रेम यावंच लागतं,जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागत!

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 12:47:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवनावरील एक कविता-गीत ऐकवितो. "ज़िन्दगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही बुधवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(ज़िन्दगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा)
----------------------------------------------------------------

             "जीवनात प्रेम यावंच लागतं, जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागतं !"
            --------------------------------------------------------

जीवनात प्रेम यावंच लागतं,
जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागतं !

जीवनात प्रेम यावंच लागत,
जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागत !
प्रेम नाही तर काहीच नाही,
जीवनाला काही अर्थच नाही उरतं !

जीवनात प्रेम यावंच लागतं,
जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागतं !
जीवन हे दुःखाचा सागरही आहे,
प्रत्येकाला तरून जावंच लागतं !

सुख दुःख तर ठरलेली आहेतच
कधी दुःख तर कधी सुख आहेच
प्रेमाचा एक शब्दचं आहे पुरेसा,
प्रेम सारं काही विसरावयास लावतं !

जीवन हे एक जाणीव आहे
प्रत्येकाच्या जीवनात काही उणीव आहे
भग्न झालेल्या हृदयाला येथे,
सारं काही सहन करावं लागतं !

आयुष्य एक वनवासच आहे
रामालाही तो घडला होता
मग सामान्य तरी कसा सुटेल,
तो प्रत्येकाला भोगावाच लागतो !

कधी जिंदगी बेवफाई दाखविते
कधी जिंदगी रुसवाई होते
कधी आपले आपल्याशी रुठतात,
इथे सर्वाना धरून चालावं लागतं !

आज माझा मित्र हरवलाय
मला एकटं ठेवून निघून गेलाय
कुणीही नाही तरी एकटंच चालायचंय,
साथीला आहे असं मानावं लागतं !

कितीही येवोत दुःखे जीवनात
बळेच मग हसावं लागतं
कितीही होवोत जखमा मनाला,
सहनशक्तीचे मलम लावावं लागतं !

कधी मेहमान होऊन येतो
कधी पाहुणा बनून येतो
कधी मित्र होऊन येतो,
कधी शत्रूचे रूप घेतो.

जीवन अनेक रूपे घेऊन येतं
जीवन खूप काही सांगून जातं
वेळ आली की आपली,
सारं काही सोडून जावं लागतं !

कधी दुःखाने ते भरलेलं असतं
तर कधी सुखाचाही लवलेश असतो
जीवनगाणे गात राहावं लागतं,
आयुष्य आपल्याला जगावं लागतं !

जीवनात प्रेम यावंच लागतं,
जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागतं !

जीवनात प्रेम यावंच लागत,
जीवनगाणे प्रत्येकाला गावचं लागत !
प्रेम नाही तर काहीच नाही,
जीवनाला काही अर्थच नाही उरतं !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================