प्रवास-आठवणीवरली कविता-गीत-प्रवास कधीच संपलेला असतो, फक्त आठवणीत गुंतवून ठेवतो !

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 05:23:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रवास-आठवणीवरली कविता-गीत ऐकवितो. "जीवन के सफ़र में राही, मिलते हैं बिछड़ जाने को,और दे जाते हैं यादें, तनहाई में तड़पाने को"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(जीवन के सफ़र में राही, मिलते हैं बिछड़ जाने को,और दे जाते हैं यादें, तनहाई में तड़पाने को)
-------------------------------------------------------------------------

             "प्रवास कधीच संपलेला असतो, फक्त आठवणीत गुंतवून ठेवतो !"
            ---------------------------------------------------------

प्रवास कधीच संपलेला असतो,
फक्त आठवणीत गुंतवून ठेवतो !

प्रवास कधीच संपलेला असतो,
फक्त आठवणीत गुंगवून ठेवतो !

प्रवास कधीच संपलेला असतो
फक्त आठवणीत गुंतवून ठेवतो !
प्रवास कधीच सरलेला असतो,
आठवणींच्या जाळ्यात माणूस गुरफटत राहतो !

प्रवासी भेटतात, प्रवासी बिछडतात
कुणी हमसफर होतं, कुणी मन तोडत
काही नाही, फक्त आठवणीच उरतात,
एकलेपणाचं दुःख त्या सांगत राहतात.

कुणी आपलं होतं, पण थोडावेळ
मग मनाचं ऐकावं लागतं, खूप वेळ
तोडायचंय तर जोडाच का ?
नशिबावर भरोसा ठेवायचाच का ?

नजरानजर होते, प्रेमही होते
पण प्रत्येकवेळी ते सफल का होते ?
शेवटी ते दुःखच ठेवून जाते,
सुखाची वाच्यता ते कधी करते ?

शेवटी जो तो एकटाच असतो
आयुष्यात कितीही नाती जोडली तरी
प्रवास हा एकट्याचाच असतो, 
चालताना आठवणी आठवून देतो.

कधी प्रेम यशस्वी होतं
कधी ते धोकेबाज निघतं
आतI कुणावर ठेवायचा विश्वास ?
संपेल का कधी हा जीवन-प्रवास ?

कधी नशिबावरच हसू येतं
कधी स्वतःवरच हसू येतं
या जीवनात सर्व काही मिळवता,
आयुष्य स्वतःच हरवून जातं.

या प्रवासात साथ सुटलीय कायमचीच
या प्रवासात माणसे तुटलीत कायमचीच
फक्त आठवणीच काय त्या उरल्यात,
माणसाला शेवटपर्यंत का त्या पुरल्यात ?

एकांतात कधी बसले असता
पुन्हा पुन्हा त्या फेर धरतात
आठवणी शेवटी आठवणीच असतात,
त्या कधीच विरत नसतात.

प्रवास कधीच संपलेला असतो,
फक्त आठवणीत गुंतवून ठेवतो !

प्रवास कधीच संपलेला असतो,
फक्त आठवणीत गुंगवून ठेवतो !

प्रवास कधीच संपलेला असतो
फक्त आठवणीत गुंतवून ठेवतो !
प्रवास कधीच सरलेला असतो,
आठवणींच्या जाळ्यात माणूस गुरफटत राहतो !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================