मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-198

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 09:21:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-198
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकाराने  आज  प्रेमाची  एक  अजब  गजब  अशी  व्याख्या  या  चारोळीतून  केली  आहे . तो  म्हणतोय , प्रेम  होतं  असतं , इथपर्यंत  सर्व  ठीक  आहे . पण  मुळातच  प्रेम  करणं  ही  काही  सोपी  गोष्ट  नाही . प्रेम  करणं  सोपं  नसतं . सर्व  करतात , म्हणूनही  ते  करायचं  नसतं . व  एखाद्या  चित्रपटासारखंही  करायचं  नसतं . किंवा  एखाद्या  पुस्तकात  वाचूनही  ते  करायचं  नसतं . किंवा  कुणाकडून  ऐकूनही  करायचं  नसतं . प्रेम  करणं  कधीच  सोपं  नसतं . तो  म्हणतोय , याचा  अर्थ  प्रेम  कधी  करायचं  नाही  असं  नाही , तर  प्रेम  तुम्ही  जरूर  करा .

================
💝 "प्रेम करणं सोपं नसतं...
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं....
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं."💘
================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================