मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-86-स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 09:35:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-86
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!"

                             स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....! --
                            -----------------------------

     हिमाचल प्रदेश मधील "कुल्लू" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला "गणाशी" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच "मलाणा" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे, या गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर "जमलु" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.

     "जमलु" नामक देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...!

     देवाच्या आणि त्याच्या प्रजेच्या मध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे "गुर" (ब्राह्मण पुजारी). हा गुर भक्ताचे गाऱ्हाणे देवाला सांगतो आणि ती "जमलु" नामक देवता या "गुर" (पुजारी) व्दारे भक्ताला उपाय सांगते...!

     मलाना गावामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय कष्ट दायक आणि गंभीर आहे, जिथे संपूर्ण भारतात जर कोणाला मुल बाळ होणार असेल तर सगळीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. मुल जन्मल्यावर मुल आणि आईची विशेष काळजी घेतली जाते...त्यांना ऊन, वारा, पाऊस या पासून रक्षण केले जाते...त्यांना आवश्यक दवा पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यांची मनोभावे सेवा केली जाते... सकस आहार दिला जातो, खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते....इथे मात्र....

     कुल्लू घाटी मधील "मलाणा" या गावामध्ये एखादी महिला प्रसूत झाली कि, देवाच्या आदेशाने त्या महिलेला तिच्या नवजात शिशुसोबत घराबाहेर काढले जाते, जन्म दिल्या पासून १५ दिवस गावाच्या बाहेर एखाद्या तात्पुरत्या तंबू मध्ये त्या दोघांना रहावे लागते. हि परंपरा आज देखील या गावातील लोक मानतात...या प्रथे विरुद्ध कोणी बोलत नाही, कारण त्याला या तथाकथित "देवता" चा कोप "गुर " व्दारे सहन करावा लागेल.

     गावामध्ये वीज, दवाखाना, शाळा देखील आहे परंतु स्त्रियांसोबत होणारा हा अमानुष खेळ यांच्या परंपरेचा एक भाग आहे. तत्पूर्वी प्रसूत झालेल्या महिलेला स्वतचे रक्ताळलेले कपडे स्वतच धुवावे लागतात, १५ दिवस नवजात शिशुचे देखील कपडे त्याच्या आईलाच धुवावे लागतात, १५ दिवस गावाच्या बाहेर राहिल्यानंतर १६ व्या दिवशी घराला रंगकाम वगैरे करून देवताच्या आदेशा नुसार तिला व तिच्या नवजात शिशूला घरात घेतले जाते. कित्येकदा १५ दिवस घराच्या बाहेर राहिल्यामुळे औषधपाणी व व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे प्रसूता किंवा त्या नवजात शिशूचा अंत होतो. आज हि गावातील लोक या रूढीचे पालन करने हे "जमलु" देवाचा आदेश आणि आपला धर्म समजतात.

     मालानाच्या स्त्रियांचे एवढेच दुखः नाही तर अशी अनेख रूढीवादी परंपरा त्यांना रोजच्या जनजीवनात छळत आहेत, नवऱ्याने बायकोला सोडून दिले तर ३०००/- रुपये देवाला अर्पण करून त्याचे कृत्य जायज समजले जाते, विधवा झाल्यास कोणताही दाग दागिना स्त्री घालू शकत नाही. अश्या कित्येक गोष्टीव्दारे "स्त्री" वर्गाची विटंबना केली जाते.

     हे देवाचे शासन आहे, देव हे सांगतो, देव ते सांगतो असे म्हणून लोकांना वेड्यात काढणाऱ्या पुजारयाना अद्दल घडविणे गरजेचे आहे, अन्यथा हे "गुर " नामक ब्राह्मण पुजारी "जमलु" देवाला खुश करण्यासाठी स्त्रियांचे अश्या प्रकारे बळी देतच राहतील. देवाच्या नावाने बाळगली जाणारी अश्या प्रकारची अंधश्रद्धा लवकरात लवकर व्हायला हवी.

     आज हि या पुरातन, रूढीवादी, धर्मांध, पुरुषप्रधान संस्कृती मध्ये एक तर स्त्रीला "देवीचा" दर्जा दिला जातो, नाहीतर "वेश्ये" चा तरी.....! (स्त्रीला महान तरी बनविले जाते नाहीतर हीन वागणूक दिली जाते, समान वागणूक दिली जात नाही )

     आज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे, परंतु आज हि खेडो पाडी, ग्रामीण भागात, हिमालयात लोक पोथी, पुराण, रूढी, अंधश्रद्धा, उपास तपास यामध्येच अडकलेले आहेत, आणि याचे मुख्यत शिकार प्रामुख्याने "स्त्री" वर्ग होताना दिसतो...याला मुख्यत रूढीवादी, अवाजवी, पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत ठरतेय, हीच पुरुषप्रधान संस्कृती सध्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बलात्कारात दिसून येत आहे, "स्त्री" ला जोपर्यंत हीन दर्जाने पाहणे, वागवणे सोडून दिले जाणार तो पर्यंत स्त्रियांवर अशे अत्याचार होताच राहणार....त्यामुळे आपणच आपल्या वागण्यात रोजच्या जीवनात, आई, बहिण, पत्नी, सहकारी यांच्या सोबत सन्मानाने वागले पाहिजे, घरातूनच स्त्रीचा सन्मान करायला शिकाल तर बाहेरच्या स्त्रीला देखील सन्मानानेच पाहाल, तेव्हा कुठे अश्या घटनांना आळा बसेल....!

--अँड.राज जाधव
(February 21, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================