प्रेमाच्या चंद्रावर-गीत-निळ्या आभाळात चंद्र हसतोय,आमच्या मिलनाची वाट पाहतोय !

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 10:56:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेमाच्या चंद्रावर कविता-गीत ऐकवितो. "नीले नीले अम्बर पर, चाँद जब आये, प्यार बरसाए, हमको तरसाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रजनी-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(नीले नीले अम्बर पर, चाँद जब आये, प्यार बरसाए, हमको तरसाये)
--------------------------------------------------------------------------

             "निळ्या आभाळात चंद्र हसतोय, आमच्या मिलनाची वाट पाहतोय !"
            ----------------------------------------------------------

निळ्या आभाळात चंद्र हसतोय,
आमच्या मिलनाची वाट पाहतोय !

निळ्या आभाळात चंद्र हसतोय,
आमच्या मिलनाची वाट पाहतोय !
सवे चांदण्यांची घेऊन डोली,
धरेस तो प्रकाशित करतोय !

निळ्या आभाळात चंद्र हसतोय
रुपेरी कोरीतून प्रेम पाझरवतोय
मध्येच डोकावून तो विचारतोय,
तुझी प्रेम तहान कोण भागवतोय ?

कुठे आहे तुझी प्रियतमा
मला पाहायचीय तुझी तिलोत्तमा
तिचे सौंदर्य मला पाहायचंय,
सारखा तो मला विचारतोय !

तू तिच्या प्रेमात आहेस खरा
तुझ्यावर ती प्रेम करतेय का ?
तुझ्या प्रेमाची तृप्ती ती करील का ?
प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर तो करतोय !

हे पहा उंच उंच पर्वत
जणू स्पर्धा करीत आहेत आभाळाशी
हे पहा अतृप्त निळे आभाळ,
पुन्हा पुन्हा झुकतंय ते सागराशी.

त्यांची अहमहमिका तू पाहतोस ना
त्यांची एकमेकांशी चुरस तू बघतोस ना
तुझ्या साथीला कोण आहे मला दाखव,
तो माझ्याशी पृच्छा करतोय !

तुला नाही वाटतं तुझ्यावर कुणी प्रेम करावं
तुला नाही वाटतं तुझ्या मिठीत कुणी शिरावं
असा साथीदार तुला अजुनी नाही भेटला,
असं विचारून तो मला खिजवतोय !

हा गार वारा पहा कसा वाहतोय
वृक्षराईंना पहा कसा तो छेडतोय
पहा हे तप्त किरण ल्यालेलं ऊन, 
मृदुल गालांना कसं पोळू पाहतंय.

तुला असं नाही वाटतं कधी
तुझ्या श्वासात कुणी श्वास मिसळावा
तुला असं नाही वाटतं कधी,
तुला मृदुल करानी कुणी कुरवाळावं.

चंद्राला माझ्याबद्दल फार काही वाटतंय
म्हणून तो हे वारंवार मला विचारतोय !
एकटा राहू नकोस तो मला सांगतोय,
माझ्या होकाराची तो वाट पाहतोय !

पाऊस किती सुंदर पडतोय
सप्तरंगी इंद्रधनूत मनसोक्त नाचतोय
तुला इच्छा नाही होतं तसं करण्याची,
प्रेमाच्या वर्षावात मनमुराद नहाण्याची.

आज तू या वर्षावात बुडून जा
या प्रेम-पावसात तू डुंबून जा
बघ, तुला कुणीतरी प्रेमाने पाहतंय,
चंद्र मला इशाराच देतोय !

बघ, नीट पहा, कुणीतरी आलंय
तुझ्या प्रेमाला कुणी साथीदार मिळालाय
तृषार्त मन तुझं तृप्त होईल,
मला तो दिलासा देतोय !

निळ्या आभाळात चंद्र हसतोय,
आमच्या मिलनाची वाट पाहतोय !

निळ्या आभाळात चंद्र हसतोय
रुपेरी कोरीतून प्रेम पाझरवतोय
मध्येच डोकावून तो विचारतोय,
तुझी प्रेम तहान कोण भागवतोय ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================