स्वप्न अधुरे

Started by Lekhani, February 02, 2023, 09:48:33 PM

Previous topic - Next topic

Lekhani

सोबत असता आम्ही बरेच स्वप्ने पाहिली
कधी मी बाबा ती आई होईची
मला नेहमी वाटे तिच्या सारखी
माझी मुलगी असावी
तिच्या सारखी नटखट,चिडखोर
मला सतवावी
मात्र तिच्या बाबा प्रमाणे ती माझी परी असावी
आईच्या आधी ति बाबा बोलावी
काही सत्यात जगली तर काही स्वप्ने अधुरी राहिली
इच्छा तर खूप होती मरे पर्यंत सोबत राहायची
तिने मात्र अर्ध्यावर वाट बदली

लेखक:-निखिल भडेकर