०२-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 02, 2023, 09:53:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.०२.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "०२-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
०२ फेब्रुवारी
जागतिक पाणथळ भूमी दिन
World Wetland Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९७१
इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर 'जागतिक पाणथळ भूमी दिन' म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
१९७१
इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
१९६२
४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति
१९५७
गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९४३
दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात
१९३३
अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१८४८
कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७९
शमिता शेट्टी – बॉलीवूड अभिनेत्री
१९२३
ललित नारायण मिश्रा – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार
(मृत्यू: ३ जानेवारी १९७५ - समस्तीपूर, बिहार)
१९०५
अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या
(मृत्यू: ६ मार्च १९८२)
१८८४
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
(मृत्यू: १० एप्रिल १९३७ - पुणे)
१८५६
स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक
(मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००७
विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
(जन्म: २७ डिसेंबर १९४४)
१९८७
अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक
(जन्म: २१ एप्रिल १९२२)
१९७०
बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
(जन्म:१८ मे १८७२)
१९३०
वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार. त्यांनी लहान मुलांसाठी 'आनंद' हे मासिक सुरू केले होते.
(जन्म: १२ एप्रिल १८७१)
१९१७
महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला.
(जन्म: ४ मे १८४७)
१९०७
दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज
(जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक- 02.02.2023-गुरुवार.
=========================================