हरामी मित्र

Started by Lekhani, February 02, 2023, 09:57:55 PM

Previous topic - Next topic

Lekhani

अजून आठवते
कोणाला तरी चोरून बघणं 
नकळत तिच्यात भारावून जाण सकाळच्या बस ची  आतुरतेने वाट बघणं
दप्तराची उशी बनवून कोणाला तरी झोपताना पाहणं
तू येताना पाहून शेवट बाकावरून
माझे हरामी मित्र वहिनी येतेय बोलणं
तुला सोडून अख्या वर्गाला माहीत असणं
झोपेत पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवणं
आपली काळजी करावी म्हणून उगाच हात पायाला  बँडेज बांधण
स्वतःची गाडी ठेऊन माझ मित्र तुझ्याशी बोलणं करून देण्यासाठी साठी त्याच त्या बस मधून येणं
नकार माहीत असूनही मुदाम माझे मित्र तुला माझ्या साठी विचारणं

लेखक:-निखिल भडेकर
लांजा