मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-199

Started by Atul Kaviraje, February 02, 2023, 10:00:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-199
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  स्वप्नाच्या  स्वरूपात  प्रेमाचे  महत्त्व  या  चारोळीतून  आपल्याला  समजावून  सांगत  आहे . त्याच्या  चारोळीतील प्रियकर आपल्या  प्रेयसीस  म्हणतोय , प्रिये  मी  दिवस  संपण्याची  वाट  पाहत  असतो . कारण  त्यानंतर  रात्र  येणार  असते . मी  रात्रीचीही  वाट  पाहत  असतो , कारण  सारी  स्वप्ने  रात्रीच  पडत  असतात . आणि  रात्र  ही  फक्त  स्वप्नांचीच  असते . आणि  पुढे  तो  म्हणतोय , रात्रीत  पडणाऱ्या  तुझ्या  स्वप्नांची  ओढ  मला  असते . त्यासाठी  मी  स्वप्ने  पडण्याची  वाट  पाहत  असतो . या   स्वप्नात  तू  नक्की  भेटणार  याची  मला  खात्री  असते . तू  मला  माहित  असल्यामुळेच , तुझ्यावर  माझे  प्रेम  असल्यामुळेच  मी  तुझी  अश्याप्रकारे  वाट  पाहत  असतो , कारण  मला  आता  तुझ्याशिवाय  कुणीच  आवडत   नाही , इतकं  प्रेम  मी  तुझ्यावर  करतो .

==================
💝 "मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते..
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते..
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते..
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस..
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.💘
==================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.02.2023-गुरुवार.
=========================================