मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-87-भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध

Started by Atul Kaviraje, February 02, 2023, 10:16:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-87
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू"

    भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू--
   -------------------------------------------------------------------

     पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते. तसेच ते ज़ीया ना भुट्टो यांच्याबद्दल पण होते.त्यानी भुट्टो यांच्यावर निरनिराळे आरोप लावून त्याना मृत्यदंड मिळेल याची व्यवस्था केली. पिलू मोदी या आपल्या जवळच्या मित्राला शेवटच म्हणून भेटायला पाकिस्तान मध्ये गेले. जवळचे मित्र असल्याने त्याना भुट्टो ना तुरुंगात जाउन भेटण्याची परवानगी लगेच मिळाली. भुट्टो हे तसे प्रचंड भारत विरोधक. १९७१ च्या युध्ाच्या वेळेला युनो मध्ये केलेले 'इंडियन डॉग्स' असा भारतीयांचा वारंवार उल्लेख करून केलेले भाषण खूप गाजले होते. इंटरनेट वर त्या भाषणाच्या क्लिप्स पण उपलब्ध आहेत. पण त्या शेवटच्या भेटीत भुट्टो यांच वेगळच रूप मोदी याना बघायला मिळाल. भुट्टो यानी मोदी याना सांगितल ,'' आम्हाला नेहमी भारतीय सांसदीय लोकशाहीची खिल्ली उडवायला आवडत. पण हे सांसदीय लोकशाहीच भारताच बलस्थान आहे. तुमच्या संसदेत नेहमी आरडाओरडा असतो, बजबजपुरी असते. पण या सगळ्यात एक उर्जा आहे. एक सुसूत्रता आहे. या लोकशाहिमुळेच भारत एकसंध आहे. नाहीतर भारताचे आतापर्यंत अनेक तुकडे झाले असते. " या कट्टर भारत विरोधकाने भारतीय लोकशाहीला दिलेली ही एक सलामीच.

     हा किस्सा पुन्हा आठवायचे कारण म्हणजे पुन्हा काही पाकिस्तानी लोकांकडून हीच प्रतिक्रिया क्वेटा मध्ये झालेल्या भीषण बॉम्बबलास्ट नंतर ऐकायला मिळाली. मी http://www.defence.pk/ या पाकिस्तानी संस्थळाचा सदस्य आहे. हे एक डिस्कशन फोरम आहे. इथे अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होत असत. जरी हे पाकिस्तानी संस्थळ असल तरी इथे कुणीही चर्चा करू शकत असल्याने अनेक राष्ट्रियत्वाचे लोक मेंबर आहेत. भारतीय, चिनी, बांगलादेशी, अमेरिकन, युरोपियन, आणि अगदी विएतनाम चे पण नागरिक पण विविध विषयांवर इथे आपली मत देत असतात. पाकिस्तानी संस्थळ असून पण हे चक्क लोकशाही धर्तीवर याचे काम चालते. म्हणजे तुम्ही पाकिस्तान वर इथे जहाल भाषेत टीका पण करू शकता. पाकिस्तान च्या राष्ट्रीय धोरणांवर पण टीका करू शकता. (अवांतर- याच धर्तीवर एक भारतीय डिस्कशन फोरम पण आहेत. पण बहुतांशी संस्थळ ही अती उजव्या व आक्रमक भारतीय राष्ट्रवादचा पुरस्कार करणार्यांकडून कडून चालवली जातात. त्याना सोयीस्कर तेवढीच मत तिथ स्वीकारली जातात. वेगळी मत असणारी लोक तिथे स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे निष्पक्ष चर्चा होण्याला मर्यादा पद्तात.त्यामुले अनेक संतुलित विचार करणारे भारतीय पण या फोरम पेक्षा पाकिस्तान डिफेन्स फोरम ला पसंती देतात.) सार्वजनिक संस्थळ असल्याने अनेक भारतीय व पाकिस्तानी कट्टर पंथीय पण तिथे धुमाकूळ घालत असतात. पण त्याचबरोबर अनेक देशामधले विचारवंत, मुत्सद्दी, निवृत्त लष्करी अधिकारी पण आपली अभ्यासू मत देत असतात. त्यात अनेक पाकिस्तानी लोकांचा पण समावेश आहे. सध्या पाकिस्तान मध्ये जे काही चालू आहे त्यामुळे या विचारवंतामध्ये अस्वस्थ विचारमंथन चालू आहे. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेला भारत आज अनेक समस्या शी लढत इंच इंच पुढे जात आहे आणि आपण आपल्या अस्तित्वाचाच लढा लढत आहोत ही वस्तुस्थिती या 'Intellectuals' ना अस्वस्थ करत आहे. परवा क्वेटा इथे बॉम्बस्फोट होऊन ८४ शीया मारले गेल्यावर या अस्वस्थेचा स्फोट झाला. आणि या स्फोटा बद्दल भारताला जबाबदार धरणार्‍या काही पाकिस्तानी मेंबेर्स ला एका सीनियर पाकिस्तानी डिप्लोमॅट ने धारेवार धरले आणि भारतीय लोकशाही बद्दल झुल्फीकार अली भुट्टो च्या जवळ जाणारे हेच मत मांडले.

--सिन्ड्रेला मेन
(February 20, 2013)
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.02.2023-गुरुवार.
=========================================