प्रेम कविता-गीत-माझं स्वप्न कधी खरं होईल, माझी स्वप्नसुंदरी मला कधी भेटेल ?

Started by Atul Kaviraje, February 02, 2023, 10:45:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, आई रुत मस्तानी कब आयेगी तू"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रजनी-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, आई रुत मस्तानी कब आयेगी तू)
-------------------------------------------------------------------------

              "माझं स्वप्न कधी खरं होईल, माझी स्वप्नसुंदरी मला कधी भेटेल ?"
             --------------------------------------------------------

माझं स्वप्न कधी खरं होईल,
माझी स्वप्नसुंदरी मला कधी भेटेल ?

माझं स्वप्न कधी खरं होईल,
माझी स्वप्नसुंदरी मला कधी भेटेल ?
बहरून गेलीय केव्हाच सारी बाग,
सुगंध वार्ता केव्हा घेऊन येईल ?

माझं स्वप्न कधी खरं होईल,
माझी स्वप्नसुंदरी मला कधी भेटेल ?
इंद्रधनू पडलंय सप्तरंगी क्षितिजावरती,
या रंगात ती मला केव्हा दिसेल ?

कळ्यांची केव्हाच फुले झालीत
वाऱ्याने ती कशी दरवळलीत
अशी महकत तू केव्हा येशील ?
माझं मन केव्हा जिंकशील ?

आता दुरून पाहू नकोस
अशी परकी होऊन नकोस
जीवाला नाहीय चैन प्रिये,
मुद्दामूनच तू हे करशील ?

आता आणखी तडपवू नकोस
असा जीवघेणा लपंडाव खेळू नकोस
ये जवळ ये, हा मजाक नाही,
आणिक किती माझी परीक्षा पाहशील ?

बघ फुले कशी फुलून आलीत
पहा, बाग कशी बहरून आलीय
फक्त तूच नाहीस हे पाहायला,
तूच नाहीस प्रेम-गीत गायला.

साऱ्यांनाच तुझी आठवण येतेय
तुला पाहण्या पहा कशी झुरतेय
तुझ्या गोड गाण्याची वाट पाहताहेत,
या सर्वांनाच तू नाराज करशील ?

आता खूपच झाले, प्रिये
आता बस झाले, प्रिये
तुला पाहण्या मन झालंय आतुर,
त्यालाही तू का झुरवशील ?

माझ्या प्रेमाचा काही भरोसा नाही
तू नही तो कोई और सही
बघ, मग नको करुस पच्छाताप,   
माझ्या डोक्याला नको देऊस ताप.

उत्कंठेची आता परिसीमा झालीय
आता प्रेमाने सीमा ओलांडलीय
आता तरी हो म्हणशील ?
आता तरी माझी होशील ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.02.2023-गुरुवार.
=========================================