मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-113-पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा

Started by Atul Kaviraje, February 03, 2023, 10:07:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-113
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा आणि पाण्याचे महत्त्व"

     आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा एक एक थेंब अमृताप्रमाने आहे. परंतु आज मोठ्या प्रमाणात पाणी नष्ट केले जात आहे, ज्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. जर पाण्याचा हा अपव्यय अशाच पद्धतीने सुरू राहिला तर येणाऱ्या काळात पिढीला पाण्याच्या एक एक थेंबाकरीता तळमळ करावी लागेल.

     पाण्याचा अभावाने भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर पाण्याचा अपव्यय थांबवावा लागेल. आज आपल्या देशात अनेक ठिकाणी बुच नसलेले नळ आहेत. या नळांमधून नेहमी पाणी वाहत राहते. काही ठिकाणी गरज नसतांना स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. आज पृथ्वीवरील जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. परंतु यातील फक्त थोडेच पाणी पिण्यायोग्य आहे. उरलेले सर्व पाणी समुद्राचे खारे आणि दूषित पाणी आहे.

     पाण्याचे आभावाने व दूषित पाणी प्यायल्याने दरवर्षी जगभरात 40 लाख लोक मृत्यू मुखी पडतात. स्वच्छता नसलेल्या दूषित पाण्याला प्यायल्याने अनेक रोग पसरतात. भारतासारख्या विकसनशील देशात या रोगांचे प्रमाण खूप जास्त आहे. पाण्याने होणाऱ्या रोगांमुळे जगभरात दर 15 सेकंदात एका बालकाचा मृत्यू होतो. शुद्ध पाणी मिळावे म्हणून दरवर्षी जगभरात 80 अरब डॉलर खर्च केले जातात.

     जीवनशैलीत फार जास्त बद्दल न करता आपण पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. दररोज एका घरातील प्रत्येक सदस्य दिवसातून सरासरी 260 लिटर पाणी वापरतो. प्रत्येक व्यक्तीला आपली जवाबदारी समजायला हवी. अन्न धुणे तसेच शिजवणे या कामांमध्ये जास्त पाणी वापरू नये. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी शौचालय, कपडे धुणे, झाडांना देणे इत्यादी कामांसाठी वापरावे. पावसाचे पाणी आपण एकत्रित करून वापरायला हवे.

     अंघोळ करताना शॉवर वापरण्याऐवजी बादली मधील पाण्याने अंघोळ करावी. होळी सारख्या सणांच्या वेळी जास्त पाणी सांडू नये. काम झाल्यावर लगेच नळ बंद करावा. जर घरातील नळ खराब झाला असेल व त्यातून पाणी टपकत असेल तर त्याला लगेजच बदलावावे, कारण थोडे थोडे पाणी टपकणाऱ्या नळाने देखील पाण्याचा खूप अपव्यय होतो.

     पृथ्वीवर जीवनाचा सर्वात आवश्यक स्त्रोत पाणी आहे. जल हेच जीवन आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून आपल्याला नष्ट होणारे पाणी रोखायला हवे. व जास्तीत जास्त पाणी अडवायला हवे आणि जास्तीत जास्त पाणी जिरवायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.02.2023-शुक्रवार.
=========================================