जीवनावर गूढ कविता-गीत-हे जीवन सरळ का नाही, हे आयुष्य सोपं का नाही ?

Started by Atul Kaviraje, February 03, 2023, 10:46:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवनावर गूढ कविता-गीत ऐकवितो. "चिंगारी कोई भड़के,  तो सावन उसे बुझाये, सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रजनी-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(चिंगारी कोई भड़के,  तो सावन उसे बुझाये, सावन जो अगन लगाये,  उसे कौन बुझाये)
--------------------------------------------------------------------------

                   "हे जीवन सरळ का नाही, हे आयुष्य सोपं का नाही ?"
                  -----------------------------------------------

हे जीवन सरळ का नाही ?
हे आयुष्य सोपं का नाही ?

हे जीवन सरळ का नाही ?
हे आयुष्य सोपं का नाही ?
हे इतकं कठीण का आहे ?
हे इतकं जटील का आहे ?

हे जीवन सरळ का नाही ?
हे आयुष्य सोपं का नाही ?
हे इतकं गुंतागुंतीच का आहे ?
हे इतकं अवघड का आहे ?

मन जेव्हा तडपू लागतं
मन जेव्हा सैरभैर होतं
तेव्हा पाऊसच येतो मदतीला
तेव्हा शीतधाराच येतात विझवायला,
     पण या पावसानेच आग लावली तर ?
     ती कोण येईल विझवायला ?

कुणी हे समजून घेईल का ?
कुणाला हे कधी उमजेल का ?

बागेत बहर फुललाय फुलांचा
मोहरून गेलेल्या सुवासिक मोहोरांचा
पण अवचित कुठूनशी येते पानगळ
पर्णहीन करते, नाहीसा करते दरवळ,
     उजाडूनच गेलीय सारी बाग,
     कोण पुन्हा आणेल ती बहराला ?

कुणी हे कधी जाणेल का ?
कुणाला हे कधी कळेल का ?

स्वप्न बाळगतात सारेच अंतरी
सत्यात पाहण्याची आस ठेवून उरी
स्वप्नांचा चक्क चक्काचूर होतो
कुणा शत्रूचा का डाव असतो ?
     आपलेच तेव्हा घाव भरतात,
     समजा आपल्यानीच जर घाव दिला ?

कुणाला याचे आकलन होईल का ?
कुणी याची उकल करील का ?

दुःख लपवायचा एकच उपाय
मदिरा सेवन हाच एक पर्याय
ही दुष्ट दुनिया तृषार्त ठेवते
तेव्हा ही दारूचं तृष्णा भागवते,
     या दारुनेच तहान वाढवली तर ?
     कोण येईल तिला तृप्त करायला ?

याचे उत्तर कुणी देईल का ?
या प्रश्नाला उत्तर आहे का ?

वादळात कुणीही नाही बचावले आजवर
हा लाटांचा का दोष आहे ?
या तुफानातून कुशल नIवIडीच वाचवतो
सुरक्षित आपली नाव किनारी लावतो,
     या नाविकानेच स्वतः नाव बुडवली,
     तर कोण येईल ती पार लावायला ?

असे अनेक प्रश्न आयुष्यात येतातच का ?
अन आयुष्यभर ते अनुत्तरित राहतातंच का ?

हे जीवन सरळ का नाही ?
हे आयुष्य सोपं का नाही ?

हे जीवन सरळ का नाही ?
हे आयुष्य सोपं का नाही ?
हे इतकं कठीण का आहे ?
हे इतकं जटील का आहे ?

हे जीवन सरळ का नाही ?
हे आयुष्य सोपं का नाही ?
हे इतकं गुंतागुंतीच का आहे ?
हे इतकं अवघड का आहे ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.02.2023-शुक्रवार.
=========================================