०४-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 04, 2023, 09:45:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.०२.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "०४-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
०४ फेब्रुवारी
जागतिक कर्करोग दिन
World Cancer Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
२००३
युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
१९६१
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान
१९४८
श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९४४
'चलो दिल्ली'चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
१९३६
कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
१९२२
चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
१७८९
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
१६७०
ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला' असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७४
उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री व राजकारणी
१९३८
पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६४), पद्मविभूषण (१९८६), कालिदास सन्मान (१९८७) इ. पुरस्कारांनी गौरवान्वित
१९२२
स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक
(मृत्यू: २४ जानेवारी २०११)
१९१७
जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)
१९०२
चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या 'द स्पिरीट ऑफ सेंट लुईस' या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.
(मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)
१८९३
चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
(मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००२
भगवान आबाजी पालव ऊर्फ 'मास्टर भगवान' – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
(जन्म: १ ऑगस्ट १९१३)
२००१
पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
(जन्म: ३१ मे १९२८)
१९७४
सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १ जानेवारी १८९४)
१८९४
अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक
(जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)
१६७०
नरवीर तानाजी मालुसरे
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2023-शनिवार.
=========================================