तुझी आठवण

Started by drapkulkarni, September 07, 2010, 11:04:43 PM

Previous topic - Next topic

drapkulkarni

तुझी आठवण

मोहरलेल्या आमराईतील कोकिळ-कूजन
ग्रीष्मा नंतर पहिला श्रावण
तुझी आठवण

अर्ध्या मिटल्या डोळ्यां पुढचे ,स्वप्न क्षणों क्षण
भर आकाशी इन्द्र-धनूचे रंग प्रदर्शन
तुझी आठवण

गुलमोहोराचे राना मधल्या, गंध-रानपण
राना मधल्या रान फळाचे, कडू गोडपण
तुझी आठवण

पहिल्या वहिल्या भेटीतले त्या, थरारले क्षण
विरहात समजते आणिक छळते, असे रितेपण
तुझी आठवण

-ashok

ही माझी स्व- रचित कविता आहे. माझ्या परवानगी शिवाय या कवितेचा उपयोग करू नये

NilamT


drapkulkarni