मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-114-कोरोना वायरस-कोरोना एक महामारी-Covid-19

Started by Atul Kaviraje, February 04, 2023, 10:04:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-114
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "कोरोना वायरस-कोरोना एक महामारी-Covid-19"

     कोरोना हा एक व्हायरस आहे, जो संक्रमणाच्या माध्यमाने आजपर्यंतच्या रोगांपैकी सर्वात जलद पसरणारा व्हायरस आहे. या व्हायरसमुळे प्रत्येक दिवशी लाखो लोक संक्रमित होत आहेत. यामागे कारण असे आहे की हा व्हायरस काही सेकंदातच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित करतो.

     असे म्हटले जाते की हा व्हायरस हवेच्या माध्यमाने सुद्धा पसरतो. आज संपूर्ण जगात या वायरसने महामारी चे रूप धारण केले आहे. ज्यामुळे लाखो लोक संक्रमित होऊन खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी आपल्याला लवकरच व्हायरस ला रोखणाऱ्या वेक्सिंनचा शोध लावावा लागेल.

     वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या विश्व संघटनेने कोरोना या आजाराला वैश्विक महामारी घोषित केले आहे. यालाच covid-19 सुद्धा म्हटले जाते. आज हा आजार जगाच्या अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे.

                  कोरोनाव्हायरसचा जन्म

     असे म्हटले जाते की कोरोनाव्हायरस ची उत्पत्ती चीनच्या 'वुहान' शहरांमधून झाली होती. कारण जगातील पहिले रूग्न याच शहरात सापडले होते. याचे एक कारण असेही आहे की, या शहरात विविध प्रकारांच्या पशुपक्ष्यांच्या प्रजातीचे मास विकले जाते. तिथल्या शास्त्रज्ञांचे मत आहे की याच पशुपक्ष्यांना ज्या बाजारात विकले जायचे तेथे एका वटवाघळाची प्रजाति या वायरसने संक्रमित होती. आणि याच वटवाघुळाचे मास खाल्ल्याने हा व्हायरस माणसांमध्ये पसरायला लागला.

     काही लोकांचे असेही मानने आहे की वुहान शहरात असलेली एक संस्था जिचे नाव वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आहे. या संस्थेत हा व्हायरस तयार करण्यात आला व तेथूनच हा वायरस संपूर्ण जगात पसरत गेला. परंतु आतापर्यंत याचे पक्के प्रमाण सापडले नाही आहेत.

                    कोरोनाव्हायरस चे लक्षण

     अजून पर्यंत तर कोरोनाव्हायरस ने पूर्णपणे बरे होण्यासाठी औषधी आलेली नाहीत. पण संपूर्ण जगाचे शास्त्रज्ञ या व्हायरसची दवा शोधण्यासाठी प्रयोग करीत आहेत.‌ शास्त्रज्ञांचे मत आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोनाव्हायरस ची औषध ते शोधून घेतील. पण तोपर्यंत या आजारा पासून वाचण्यासाठी त्यांनी काही लक्षणे सांगितली आहे. जर कोणाला जास्त प्रमाणात सर्दी-खोकला, श्वास घेण्यात अडचण, गळ्यात दुखणे, अति प्रमाणात ताप इत्यादी लक्षणे दिसत असतील तर त्यांनी तत्काल कोरोनाव्हायरस चा टेस्ट करायला हवा.

                  कोरोना पासून वाचण्याचे उपाय

     जरी या वायरस ची दवा अजून तयार झालेली नाही, तरीही काही लहान-मोठे उपाय आहेत ज्यांना करून आपण या कोरोनाव्हायरस पासून दूर राहू शकतो. जसे परत-परत हातांना वाहत्या पाण्यात धुऊन घेणे. सॅनिटायझर चा वापर करणे. नेहमी बाहेर जाताना मास्क लावणे व घरी आल्यावर 60% अल्कोहल असलेल्या सॅनिटायझर ने हात स्वच्छ करणे. शिंकताना किंवा खोकलताना चेहऱ्यावर रुमाल धरणे. इत्यादी काही उपाय आहेत ज्यांचे पालन आपण केले तर कोरोनाव्हायरस ला आपल्यापासून लांब ठेवू शकतो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2023-शनिवार.
=========================================