प्रेमातील अविश्वासाचे गीत-तुझ्या गल्लीत नाही येणार कधी, तुला नाही भेटणार मी कधी

Started by Atul Kaviraje, February 05, 2023, 05:22:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेमावरल्या अविश्वासाची कविता-गीत ऐकवितो. "तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद, तेरे मिलने को न आएंगे सनम, आज के बाद"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद, तेरे मिलने को न आएंगे सनम, आज के बाद)
----------------------------------------------------------------------

               "तुझ्या गल्लीत नाही येणार कधी, तुला नाही भेटणार मी कधी !"
              -------------------------------------------------------

तुझ्या गल्लीत नाही येणार कधी,
तुला नाही भेटणार मी कधी !

तुझ्या गल्लीत नाही येणार कधी,
तुला नाही भेटणार मी कधी !
तुझ्या प्रेमावर विश्वास नाही राहिलाय माझा,
तुझ्या नजरेसही नाही पडणार मी कधी !

तुझ्या गल्लीत नाही येणार कधी,
तुला नाही भेटणार मी कधी !
वाटलं नव्हतं तू अशी वागशील,
विरहाग्नीत होरपळून टाकशील कधी !

स्वप्नच जा समजून आपल्या भेटीचे
घर सजवलंस तू आज कुणा परक्याचे
डागण्या देऊन मला तू विरहाच्या,
घर बसवलंस तू आज दुसऱ्याचे.

त्या प्रेम-नात्यावर आज पडदा पडलाय
दुःखाचा नवीन अंक सुरु झालाय
सुखांतिका वाटली होती माझ्या जीवनाची,
अंत दुःखाचा होईल वाटलं नव्हतं कधी !

आज मी तुला विसरून गेलोय, प्रिये
तुही मला विसरली असशीलच
नको त्या जाचक आठवणींचा गतःकाळ,
विसरून गेलोय मी तो भूतकाळ.

पुन्हा कृष्ण-घन येतील अंबरी दाटून
पुन्हा जातील त्या धारा बरसून
रस्तेही जातील चिंब चिंब होऊन,
आठवणींचं धुकंही जाईल हळूहळू विरून.

बस आता उरल्यात फक्त आठवणीच
केव्हातरी तुझ्या बाहुपाशात होतो मी
कडकडणाऱ्या विजांच्या लख्ख प्रकाशात,
तुझा चिंतातुर चेहरा पहात होता मी.

आज परिस्थिती झालीय विपरीत
आज तू आहेस दुसऱ्याच्या मिठीत
माझं काय, मी दुःखालाही लावेन गळा,
तोच मला आहे आपलासा, लावतोय लळा.

तुझ्या गल्लीत येणं मी केव्हाच सोडलंय
तुझ्या गल्लीत गाणं मी केव्हाच सोडलंय
सूर माझा दुःखाचा लागेल आज,
मला वाटलं नव्हतं याआधी !

तुझ्या गल्लीत नाही येणार कधी,
तुला नाही भेटणार मी कधी !

तुझ्या गल्लीत नाही येणार कधी,
तुला नाही भेटणार मी कधी !
तुझ्या प्रेमावर विश्वास नाही राहिलाय माझा,
तुझ्या नजरेसही नाही पडणार मी कधी !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2023-रविवार. 
=========================================