मायबोली-लेख क्रमांक-7-विवार...

Started by Atul Kaviraje, February 05, 2023, 10:31:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-7
                                    --------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"विवार..."

                                        विवार...
                                       ------

     कधीतरी अनपेक्षित पणे खोल काळोखाच्या गर्तेत तुम्ही भोवर्यात फिरत असल्याचे जाणविते तेव्हा अर्थातच पायाखाली जमीन नसते. कृष्णाने जे जे केले ते त्याची माया. आपण जे जे केले ती माया नाही. माया जमा केल्यास काया-वाचा बंद होते Happy माया काय आणि पाप पुण्याचा हिशोब काय ! सारे म्हणे साठून राहते . संचित. माया संचित नसते. मायावी जगात आल्यानंतर माया आणि मोह अनेक प्रकारे येऊ लागतात आपल्या सहवासात. कोणी म्हणते " आयुष्य जगण्यासाठी आहे. कल का किसने देखा है ! " काही लोक मात्र कल - आज - और- कल सारेच बघतात. काही मात्र भूत काळात रममाण होतात. उपाय शोध चालू असतो. मात्र तुम्ही आहात भोवर्यात. जो खोल आहे. खोल , अंधारी , कला , गडद. ज्याची खोली कधीच व्याप्ता येणार नाही असा काहीसा. पु. ला. नची " निळाई " पण अशीच आहे. खोल, गडद ; पण निळेशार. कृष्ण गर्तेत भोवर्यात सापडता त्यातून दिसत नाही. बाहेर पडता येत नाही. तुम्ही मात्र खोल आणि अद्धीक्च खोल जात राहता. मर्जी सह अथवा म्र्जीखीलाफ.

     राम म्हणतो , एक पत्नी व्रत म्हणजे चारित्र्य. रावणाचा वध स्वहस्ते करणे धर्म आणि कर्तव्य. कृष्णाने केली ती माया. कौस , जरासंध यांचा वध झालाच कि. मात्र महाभारताच्या कुरुक्षेत्री नामानिराळा राहिला तो कृष्ण. कृष्ण म्हणजे सावळा , "कृष्ण " . द्रौपदीचा सखा आणि दीर , सोळा हजार एकशे सात स्त्रियांचा पती , रुक्मिणी आणि भामेचा पट्ट-राणी म्हणून लाड करणारा " मधुसूदन " . कृष्ण भारी होता. राम सुधा भारी होता.

     निळाई आहे कि कृष्ण - विवर? माया मात्र सारीकडेच. धर्म , कर्तव्य याही युगात आहेतच. मोहिनी आज हि आहे. काय आहे काय नाही हिशोब लागण्यासारखा नाहीच मूळी. कारण या सार्याच गोष्ठी भौत्तिक , क्षणिक , क्षण भंगुर.

     आपण फक्त फिरत राहतो. ........एका विवाराम्ध्ये.

--Diet Consultant
(6 September, 2012)
------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                     ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2023-रविवार.
=========================================