बघ जरा मोकळे आकाश

Started by तुतेश रिंगे ✍️, February 06, 2023, 04:43:15 AM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️

होऊ नको तु निराश
वर बघ जरा मोकळे आकाश

काळानुरूप ते बदलत
ऊन वारा पाऊस साऱ्यांशीच ते झटत

सुर्य ही रोज पश्चिमेला मावळतो
तेव्हा अंधार साऱ्या जगाला गिळतो

घेऊनी नवी आशा पुन्हा सुर्य उगवतो
अंधाराशी लढायला तो सिद्ध होतो

हार म्हणजे नव्हे पुर्ण विनाश
नको होऊ तु हताश

विजयासाठी कर पुन्हा प्रयास
खडतर असेल थोडा प्रवास

फक्त होऊ नको तु निराश
वर बघ जरा मोकळे आकाश
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__