प्रतिक्षेतल्या प्रेमाची कविता-माझं प्रेम तुला बोलावतंय, तुला कधीपासून हाक देतंय

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 04:47:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रतिक्षेतल्या प्रेमाची कविता-गीत ऐकवितो. "आ जा, तुझको पुकारे मेरा प्यार"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(आ जा, तुझको पुकारे मेरा प्यार)
---------------------------------------------

                 "माझं प्रेम तुला बोलावतंय, तुला कधीपासून हाक देतंय !"
                --------------------------------------------------

माझं प्रेम तुला बोलावतंय,
तुला कधीपासून हाक देतंय !

माझं प्रेम तुला बोलावतंय,
तुला कधीपासून हाक देतंय !
तुला शपथ प्रिये, माझ्या प्रेमाची,
तुझ्या उत्तराची अपेक्षा करतंय !

माझं प्रेम तुला बोलावतंय,
तुला कधीपासून हाक देतंय !
तू माझी आहेस, मला तुला मिळवायचंय,
तुझ्या प्रतिसादाची वाट पाहतंय !

या अंतिम समयास माझा श्वास मंद होतोय
शेवटच्या क्षणापर्यंत खोल आवाज तुला पुकारतोय
आता तरी तू एकदा येऊन जा,
डोळ्यांत प्राण आणून मी तुझी वाट पाहतोय.

संधिप्रकाश मंदावत चाललाय पश्चिमेस
सूर्य केव्हाच गेलाय दमून अस्तास
दिशा हळूहळू कवटाळू लागल्यात अंधारास,
तरीही आहे उरी तुला भेटण्याची आस.   

वर्षानुवर्षे होतो मी तुझ्या प्रतीक्षेत
कित्येक वर्षे काढलीत तुझ्या आठवणीत
हेच ते वळण, जिथे मी आजही उभा आहे,
खंगलेल्या तनाने, भंगलेल्या मनाने वाट पहात आहे.

प्रवाहात वाहून चालल्यात सर्वच आठवणी
याच किनाऱ्यावरल्या सर्व होत्या त्या साठवणी
तुझा किनाराच कुठेतरी हरवून गेलाय,
दृष्टिक्षेपातून नाहीसा होत चाललाय.   

तरीही तुझी आस ठेवून मी उभा आहे
त्या किनाऱ्यावर तुझी प्रतिमा मला दिसेल
भास का होईना, मी मनाला पटवून देईन,
अरे वेड्या ती तुझीच प्रिया असेल.

युगायुगांपासून भेटत होतो आपण
युगायुगांचे ऋणानुबंध होते आपले
प्रेमरज्जुनी बांधून ठेवले होते आपणास,
ते एकाच क्षणातच असे तुटले ?

तुला मी आजही माझ्या मनात ठेवले आहे
तुला मी अजुनी माझ्या मनात साठवले आहे
शपथ माझ्या प्रेमाची, कितीही युगे जावोत,
जन्मोजन्मी तुला माझीच साथ लाभणार आहे.

माझं प्रेम तुला बोलावतंय,
तुला कधीपासून हाक देतंय !

माझं प्रेम तुला बोलावतंय,
तुला कधीपासून हाक देतंय !
तुला शपथ प्रिये, माझ्या प्रेमाची,
तुझ्या उत्तराची अपेक्षा करतंय !

माझं प्रेम तुला बोलावतंय,
तुला कधीपासून हाक देतंय !
तू माझी आहेस, मला तुला मिळवायचंय,
तुझ्या प्रतिसादाची वाट पाहतंय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.   
=========================================