आठवणींची कविता-ते दिवस नाही येणार परतुनी, उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 05:27:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, गत-दिवसांच्या आठवणींची कविता-गीत ऐकवितो. "याद न जाए, बीते दिनों की, जाके न आये जो दिन, दिल क्यूँ बुलाए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(याद न जाए, बीते दिनों की, जाके न आये जो दिन, दिल क्यूँ बुलाए)
--------------------------------------------------------------------------

         "ते दिवस नाही येणार परतुनी, उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !"
        ---------------------------------------------------------------

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !
त्या आठवणींवरच जगायचे उद्याही,
त्या आठवणींवरच जगत आहे आजही !

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !
विसरू पाहता त्या नाही येत विसरता,
सामोरी येतात त्या पुनः पाहता पाहता !

मनाला अजुनी त्यांची आस का आहे ?
मन त्याविना आजही उदास का आहे ?
ते त्यांना परत परत का बोलावतंय ?
भूतकाळात ते पुन्हा पुन्हा का जातंय ?

या प्रश्नाला कुणाकडेही नाही उत्तर
याची कुणीही नाही करू शकत उकल
माहित असूनही, त्या दिवसांचा झालाय भूतकाळ,
वर्तमानात ते त्यांचा का शोध घेतंय ?

जर ते दिवस पाखरू झाले असते
मज प्रेमाने ते बिलगले असते
उडून जाऊ नयेत ते म्हणून,
त्यांना सोन्याच्या पिंजऱ्यात मी ठेवले असते.

त्यात त्यांना मी आवडीने पाळले असते
मोत्यांचा चुरा त्यांना चारा दिला असता
त्यांची मनापासून देखभाल केली असती,
त्यांना प्रेमाने कुरवाळलेही असते.

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !
त्या आठवणींवरच जगायचे उद्याही,
त्या आठवणींवरच जगत आहे आजही !

तिच्यावरले प्रेम अजुनी मला आठवतंय
ते चित्र आजही डोळ्यांपुढे उभ राहतंय
कुठे ठेवू नि कुठे नाही असं झालं होत,
माझं मन मोठ्या संकटात सापडलं होत.

तिची छबी अजुनी आहे माझ्या मनःपटलात
कोरली गेलीय कायमचीच माझ्या अंतर्मनात
कितीही मिटवू पIहिली, मिटत नाहीय ती,
माझ्या मनाचाच अमीट भाग झालीय ती.

आज तिची आठवण आहे, तरी ती माझी आहे
परकी जरी वाटली, तरी आठवणीत कायम आहे
ती माझे जीवन आहे, जीवनाचा भाग आहे,
मी तिच्या अवीट आठवणीत आजही जगत आहे.

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !
त्या आठवणींवरच जगायचे उद्याही,
त्या आठवणींवरच जगत आहे आजही !

ते दिवस नाही येणार परतुनी,
उरल्यात फक्त त्या दिवसांच्या आठवणी !
विसरू पाहता त्या नाही येत विसरता,
सामोरी येतात त्या पुनः पाहता पाहता !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.   
=========================================