मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-203

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 09:26:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                 चारोळी क्रमांक-203
                             ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  प्रेमाच्या  भावनेची  एक  काहीशी  वेगळीच  चारोळी  आपणापुढे  प्रस्तुत  करीत  आहे . तो  म्हणतोय , शेवटी  असून  असून  काय  प्रेम  ही  मनातील , हृदयातील  फक्त  एक  भावनाच  असते . ती  मनातच  ठेवा , किंवा  विशद  करा , उघड  करून  सांगा . पुढे  तो  अनेक  विशेषणांनी  याची  व्याख्या  करीत  आहे . तो  म्हणतोय , ही  भावना , कुणाला  कळलेली  असते,  तर  कुणी  यापासून  अनभिज्ञही असतात . तर  कुणाला  कळूनही  ती  न  कळलेली  अशीच  असते . कुणी  ती  प्रथम  भेटीतच  उघड , व्यक्त  केलेली  असते , तर  कुणी  ती  आयुष्यभर  मनातच  लपवून , दडवून  ठेवलेली  असते . कुणी  ती  मजेखातर , गम्मत  करण्यासाठी  वापरलेली , तर  कुणाची  ती  आयुष्यभरासाठी  गम्मतच  ठरलेली असते . कुणाचेतरी  ती  आयुष्य  उभारणारी , तर  कुणाला  ती  आयुष्यातून  उठवणारी  असते . अंती , शेवटी  ती  फक्त  एक  भावनाच  असते . असे  अनेक  प्रेमाच्या  भावनेचे  कंगोरे  आपणापुढे  मांडून  नवं-चारोळीकार  आपणास  विचार  करण्यास  भाग  पाडतो .

=================
💝 "प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभर लपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना.💘
=================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक- 06.02.2023-सोमवार.
=========================================