मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-116-प्रदूषण एक समस्या

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 09:36:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-116
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "प्रदूषण एक समस्या"

     आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जस-जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत. 'प्रदूषण' हा असाच तंत्रज्ञानाच्या एक दुष्परिणाम आहे. आज प्रदूषण एक समस्या बनलेली आहे.
       
     आपल्या धरतीवर आज तीन तऱ्हेचे प्रदूषण आहे: जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. विकसनशील देश जसे भारत, थायलँड, पाकिस्तान आणि अन्य अनेक देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचे योग्य वापर न करणे आणि अधिक तांत्रिक माहिती माहीत नसलेले हे देश आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास असमर्थ आहेत. याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पानी प्यायल्याने अनेक रोग होतात आणि हे रोग आरोग्याला धोकादायक ठरतात. म्हणून अशुद्ध पाणी हा प्राणघातक शत्रू आहे.
       
     आज मोठ मोठे शहर वाढते मोटरसायकल, चारचाकी वाहने आणि इतर मोटार वाहनामुळे वायु प्रदूषणाचा सामना करत आहेत. विकसित झालेल्या शहरात औद्योगिकरणाच्या दर हा खूप अधिक असतो. यामुळे निसर्ग आपले संतुलन वाचवण्यात अयशस्वी होतो. कारखान्यांच्या धुराड्यातून निघणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो आणि ऑक्सिजनच्या आभाव झाल्याने श्वासांसंबंधी रोग व्हायला लागतात. बऱ्याचदा हे प्रदूषण अधिक झाल्याने हृदय विकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.
       
     ध्वनि प्रदूषण हे सुद्धा वायुप्रदूषणा एवढेच घातक आहे. मोठ मोठ्या महानगरात वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे ध्वनि प्रदूषण वाढते. बहिरेपणा, मानसिक गोंधळ आणि मानसिक असंतुलन हे ध्वनी प्रदूषणाचे काही दुष्परिणाम आहेत. आज ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या आवाजात स्पीकर आणि बँड वाजविण्यावर बंदी आणायला हवी. मनुष्य निसर्गाला विषारी करीत आहे, जर मनुष्य स्वतः वेळीच सावध झाला नाही तर त्याला या प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यापासून कोणीच वाचवू शकत नाही.
       
     प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायक तर आहेच पण या सोबत वनस्पती आणि प्राण्यांना ही ते घातक आहे. प्रदूषण मानवजातीसाठी एक समस्या आहे. जोपर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने होणाऱ्या या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी उपाय शोधून घेत नाही तोपर्यंत मानवी जीवन धोक्यात आहे. शासनाने याची दखल घ्यायला हवी आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी वृक्ष लागवड, जल शुद्धीकरण, गॅस वर चालणारे चुल्हे इत्यादी उपक्रम राबवायला हवेत. आपल्याला प्रदूषणाशी लढा देऊन त्याला कोणत्याही किमतीवर संपवायचे आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.
=========================================