मायबोली-लेख क्रमांक-8-तुफानी वादळात मिणमिणता दिवा !..भाग-2

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 10:03:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मायबोली"
                                    लेख क्रमांक-8
                                   --------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"पूर्ण विचार करा ..."

                         तुफानी वादळात मिणमिणता दिवा !......भाग-२
                        ------------------------------------------

     कालपासून भारताबाहेरच्या हिंदूंच्या बद्दल एक लेख-मालिका सुरु केली आहे.आज pacific महासागरातील फिजी या देशाबद्दल !

     १९ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारतीय हिंदू मजूर या बेटावर नेवून तिथे असलेल्या नैसर्गिक साधन-संपत्तीचा व्यापारी तत्त्वावर स्वत:च्या फायद्यासाठी केला , पण कामासाठी आलेल्या हिंदू मजुरांची पुढची पिढी इथेच वाढली आणि त्यांना इंडो-फिजीयन असे नाव दिले गेले .१९७० साली फिजी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला ,पण तोपर्यंत मेथडीस्त चर्चने आपले हातपाय पसरले होते,अधिकाधिक क्रिश्चन लोकांना या बेटावर आणून फिजीला कॅथोलिक ख्रिश्चन देश घोषित करावे यासाठी चर्च आकाशपाताळ एक करत होते. त्यातून मग पुढे हिंदू-ख्रिश्चन दंगली होऊ लागल्या .

     २००० साली लोकशाही प्रक्रियेद्वारा निवडून आलेल्या फिजीयन हिंदू पंतप्रधान महेंद्र चौधरी यांना अपहरण करून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.हिदू मंदिरांवर सतत हल्ले होत राहिले आहेत. ४० ते ५० % पर्यंत लोकसंख्या असूनही या हिंदुबहुल देशातील हिंदू जनतेला कोणी वाली राहिला नाही.

     फिजीतील हिंदू आजही प्रचंड विरोध , हाल-अपेष्टा आणि दू:ख /तिरस्कार झेलूनही आपले दिवाळी/होळी सारखे हिंदू सण ,धर्म आणि परंपरा जपण्याचा निकराचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न हा आहे कि ते मायभूमी म्हणून आपल्याकडे पाहत असताना आपण त्यांच्यासाठी काय करणार?

--मंदार कत्रे
(22 September, 2012)
-------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.
=========================================