आयुष्यात हरलेल्या माणसाची कविता-मला मोहचं नाही कशाचा, मला मोहचं नाही आयुष्याचा !

Started by Atul Kaviraje, February 07, 2023, 12:20:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आयुष्यात हरलेल्या माणसाची कविता-गीत ऐकवितो. "कोई सागर दिल को बेहलाता नहीं, बेखुदी में भी क़रार आता नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही मंगळवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(कोई सागर दिल को बेहलाता नहीं, बेखुदी में भी क़रार आता नहीं)
-------------------------------------------------------------------------

                  "मला मोहचं नाही कशाचा, मला मोहचं नाही आयुष्याचा !"
                 ---------------------------------------------------

मला मोहचं नाही कशाचा,
मला मोहचं नाही आयुष्याचा !

मला मोहचं नाही कशाचा,
मला मोहचं नाही आयुष्याचा !
मोहाचे क्षण मी मागे टाकलेत
उरलेलेही नजर-अंदाज केलेत,
     क्षण-भंगुर जीवनाचा काय भरोसा ?
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

मला मोहचं नाही कशाचा,
मला मोहचं नाही आयुष्याचा !
सागर दुरून मला बोलावतोय
लाटाकंडून मला निरोप पाठवतोय,
     मला अनुभव आहे लाटांसामान फुटण्याचा,
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

कोणत्याही स्थितीत मला आराम नाही
कुठल्याही परिस्थितीत मला चैन नाही
मी ते आज सर्व पाठी टाकलंय
मी माझ्या मनाला नाही गुंतवलंय,
     तोल सांभाळतोय मी माझ्या मनाचा,
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

मी दगड नाही, एक माणूस आहे
माझ्या छातीत हृदय धडकत आहे
मलाही काही आहेत भावना
मलाही आहेत दुःखाच्या संवेदना,
     आटोकाट प्रयत्न करतोय स्वतःला सावरण्याचा,
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

कालपर्यंत माझ्यासह सारे होते
काफिल्यात माझी साथ करीत होते
आज तो कIरवा नाही, साथीला कुणीही नाही
मार्ग दाखविण्या मज कुणी नाही,
     मार्ग चालतोय मी मुकाट एकलेपणाचा,
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

माझे प्रतिबिंब मला आवडत होते
मला आरश्यात पाहणे आवडत होते
माझे स्वरूप मला ते दाखवत होते
आज, माझेच रूप मला दिसत नाहीय,
     दोष आहे का तो आरश्याचा ?
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

मला मोहचं नाही कशाचा,
मला मोहचं नाही आयुष्याचा !

मला मोहचं नाही कशाचा,
मला मोहचं नाही आयुष्याचा !
मोहाचे क्षण मी मागे टाकलेत
उरलेलेही नजर-अंदाज केलेत,
     क्षण-भंगुर जीवनाचा काय भरोसा ?
     मला मोहचं नाही आयुष्याचा !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================