आयुष्याच्या मैफिलीची कविता-महफिल माझी बेसुरी झालीय, या जगानेच तिला नाकाम ठरवलीय

Started by Atul Kaviraje, February 07, 2023, 05:03:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आयुष्याच्या सुन्या मैफिलीची कविता-गीत ऐकवितो. "ये दुनिया ये महफ़िल, मेरे काम की नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(ये दुनिया ये महफ़िल, मेरे काम की नहीं)
----------------------------------------------------

           "महफिल माझी बेसुरी झालीय, या जगानेच तिला नाकाम ठरवलीय !"
          ------------------------------------------------------------

महफिल माझी बेसुरी झालीय,
या जगानेच तिला नाकाम ठरवलीय !

महफिल माझी बेसुरी झालीय,
या जगानेच तिला नाकाम ठरवलीय !
रंग भरतं होते तेव्हा मैफिलीत,
आज ती उदास, सुनीसुनी झालीय !

महफिल माझी बेसुरी झालीय,
या जगानेच तिला नाकाम ठरवलीय !
उत्स्फूर्तता, वाहवा व्हायची दणक्यात,
दादच मिळायची तिला बंद झालीय !

माझे दुःख गीत मी कुणाला ऐकवू ?
माझ्या मनाचे दुखणे मी कुणाला सांगू ?
मनाची गाऱ्हाणी माझ्या मनातच राहिलीय,
मनाने सारी दुःखे आतल्याआतच सहलीय !

केव्हातरी माझ्या जनाज्याला माणसे होती
सर्वांनीच मृत्यूला हजेरी लावली होती
प्रथमच का होईना परकेही आले होते,
आपल्यानीही मला तेव्हा खांदा दिला होता.

माझाच मृत्यू मी याची डोळा पाहतोय
माझा मर्त्य देह कफनात गुंडाळला जातोय
लक्ष नाही कुणाचे, दिवा सरणाचा विझत चाललंय,
देहाची माझ्या राख-रांगोळी झालीय !

केव्हातरी जिच्यावर जीवापाड केले होते प्रेम
तिची आज काहीच खबर नाहीय मला
मी स्वतःच हरवून गेलोय या जंजाळात,
तिला तरी कुठे शोधू मी या जीवन-रगाड्यात.

कुणा शत्रूलाही अशी वागणूक मिळू नये
कुणा शत्रूचेही असे नुकसान होऊ नये
प्रेमात कुणालाही अशी शिक्षा मिळू नये,
प्रेमात कुणालाही असा जाच होऊ नये.

जे शोधतात, त्यांना देवही सापडतो
मनातील श्रद्धेने ईश्वरही प्राप्त होतो
माझी एकचं आहे अंतिम मनीषा,
ती नाही, तर तिची झलक तर दिसावी.

गजबजाट आहे नुसता या शहरात
सुळसुळाट आहे लोकांचा या बाजारात
मला माझे, एक पक्के स्थान हवंय,
अगदीच नाही, तर तात्पुरता निवारा हवाय.

जे प्रेम हरवले होते माझे
नयन त्यालाच शोधीत आहेत
दुःख विसरण्याचा प्रयत्न करतोय,
निदान काहीतरी बहाणा करतोय.

आज माझी बाजी पलटली आहे
नशिबाने माझ्यावर मात केली आहे
इतकं होऊनही मी हार नाही मानलीय,
भेटीची आस मी मनी बाळगलीय.

अजूनही मला कुणीतरी बोलावतंय
अजूनही मला कुणीतरी हाक देतंय
कदाचित मनाचा भास असावा तो,
मला थांबण्यास ते प्रवृत्त करतंय.

माझ्याकडे आता काही पर्यायच नाही
निरुपाय म्हणून मी हे करीत राही
एक तर सारी बंधने झुगारत राहीन,
नाहीतर फक्त तुटलेले मन जोडीत राहीन.

हे पर्वतांनो, मला मार्ग करून द्या
हे काट्यानो, माझ्या रस्त्यात येऊ नका
मी आज त्या दुनियेत चाललोय,
जिथून आजवर नाही कुणी परतलय.

या मैफिलीत मी पुन्हा येणार नाही
या मैफिलीत मी पुन्हा गाणार नाही
मी कायमचेच प्रस्थान करतोय,
आज मला इथे स्थान नाही.

महफिल माझी बेसुरी झालीय,
या जगानेच तिला नाकाम ठरवलीय !

महफिल माझी बेसुरी झालीय,
या जगानेच तिला नाकाम ठरवलीय !
रंग भरतं होते तेव्हा मैफिलीत,
आज ती उदास, सुनीसुनी झालीय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================