आठवणींवरली कविता-गीत-माझे मन तर तेच आहे, फक्त तुझ्या आठवणी बदलताहेत !

Started by Atul Kaviraje, February 08, 2023, 03:06:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आठवणींवरली कविता-गीत ऐकवितो. "दिल के झरोखे में तुझको बिठाकर, यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही बुधवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(दिल के झरोखे में तुझको बिठाकर, यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर)
-------------------------------------------------------------------

                "माझे मन तर तेच आहे, फक्त तुझ्या आठवणी बदलताहेत !"
               -----------------------------------------------------

माझे मन तर तेच आहे,
फक्त तुझ्या आठवणी बदलताहेत !
आजही मनात तूच तर आहेस,
तुझ्या आठवणी नव्या रंगात सजताहेत !

माझे मन तर तेच आहे,
फक्त तुझ्या आठवणी बदलताहेत !
मनाची राणी तूच तर आहेस,
आठवणी दुल्हनचा साज चढविताहेत !

तुला मी नेहमीच पाहतो वधूच्या वेशात
तुला मी नेहमीच पाहतो साज-शृंगारात
माझ्या मनाच्या कोंदणात तुला जपलंय,
आठवणींना सुवर्ण-शिंपल्यात जणू संभाळलंय.   

इतकं असूनही तू उदास का ?
तुझ्या चेहऱ्यावर हा रुसवा का ?
तुझ्या आठवणी सजून धजून येताहेत,
तुझ्या आठवणी सोन-सळीत गुंफताहेत.

जरी तू झालीस स्वप्न-सुन्दरी कुणाची
स्वप्ने पाहिलीस जरी तू नव्या घराची
माझ्याकडे तुझ्या आठवणींचे पुस्तकच आहे,
चाळत बसेन प्रत्येक पर्णिका तुझ्या आठवणींची.

जरी तू झालीस रुखसत डोलीतून
जरी तू गेलीस येथला उंबरठा ओलांडून
माझ्याकडे तुझ्या आठवणींचा अल्बमचं आहे,
त्यातील प्रत्येक फोटोला आजही तुझा सुगंध आहे.

माझ्या मदिरेची नशा तूच होतीस
माझ्या महफिलची साकीही तूच होतीस 
न पिताही मला तुझी नशा होती,
तुझ्या डोळ्यातून ती मला पीत होती.

तुझ्या घनघोर केशसंभाराच्या छायेत
मला अतुल्य विसावा मिळायचा
तुझ्या कृष्ण-कुंतलात गुरफटून मन,
एक आपलासा सहारा पाहायच.

आज आठवणींचा कवडसा पुनः पडलाय
तुझ्या आठवणींना उजागर करू लागलाय
ती उन्हाची तिरीप प्रकाशित करतेय,
तुझ्या आठवणींना पुनः उजाळा देतेय.

तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही
ना अढी, ना तक्रार, ना राग, ना हेवा
तुझ्याबद्दल माझ्या मनात आजही आहे,
तेच प्रेम, तोच लगाव, तीच आपुलकी, तोच ठेवा.

हृदयभंग जरी माझं झालंय
शत तुकड्यांत विभागलं गेलंय
तरीही तोंडून चकार नाही काढणार,
साऱ्या वेदनाना मी पिऊन टाकणार.

तुला आजही संभाळलंय हृदयात
पूज्य भाव आहे आजही मनात
नयनांत तुझीच तसबीर आहे,
तू देवीचं आहेस माझी हृदय मंदिरात.

तुझ्या आठवणी जातI जात नाहीत
त्या नव्याने पुन्हा आठवत राहतात
आठवणींनी घरचं केलंय माझ्या मनात,
अमूल्य ठेवाच आहे तो माझ्या आयुष्यात.

माझे मन तर तेच आहे,
फक्त तुझ्या आठवणी बदलताहेत !
आजही मनात तूच तर आहेस,
तुझ्या आठवणी नव्या रंगात सजताहेत !

माझे मन तर तेच आहे,
फक्त तुझ्या आठवणी बदलताहेत !
मनाची राणी तूच तर आहेस,
आठवणी दुल्हनचा साज चढविताहेत !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2023-बुधवार.
=========================================