दुःख विसरण्यावरली कविता-गीत-आज माझी अवस्था बेभान आहे, एका वेगळ्याच धुंदीत मी आहे

Started by Atul Kaviraje, February 08, 2023, 05:15:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, दुःख विसरण्यावरली कविता-गीत ऐकवितो. "हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये, साग़र में ज़िन्दगी को उतारे चले गये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सायंकाळ-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये, साग़र में ज़िन्दगी को उतारे चले गये)
-----------------------------------------------------------------------

             "आज माझी अवस्था बेभान आहे, एका वेगळ्याच धुंदीत मी आहे !"
            ---------------------------------------------------------

आज माझी अवस्था बेभान आहे,
एका वेगळ्याच धुंदीत मी आहे !

आज माझी अवस्था बेभान आहे,
एका वेगळ्याच धुंदीत मी आहे !
न जाणो कितीवेळा मी तुला पुकारलंय,
या नशेत मला काहीच नाही समजलंय !

आज माझी अवस्था बेभान आहे,
एका वेगळ्याच धुंदीत मी आहे !
ही अवस्था सुखाची आहे, कि दुःखाची ?
या साऱ्यांच्या पलीकडे मदिरेने मला नेलंय !

ही माझी मद्य-धुंद अवस्था नेहमीचीच आहे
वाटलं, न वाटलं, तरी मी पितच आलो आहे
कारण, अकारण, मी तिला सेवीतच आलो आहे,
माहित नाही तिने मला कुठे नेऊन ठेवलंय !

कधी माझ्या आयुष्याला मी डोहात बुडवलंय
कधी मी माझ्या जीवनाला सागरात उतरवलंय
हरपलेल्या शुद्धीने मला दिवसI तारे दाखवलेत,
माझ्या हरवलेल्या बुद्धीने मला सितारे दाखवलेत.

तुला मी याचं नशेत तेव्हा पाहत होतो
तुला मी याचं धुंदीत तेव्हा शोधत होतो
माहित नव्हतं नशा उतरवल्यावर काय होत ?
तू न सापडल्यावर मी पुनः नशाच करीत होतो.

तू होतीस तेव्हा जीवन होत भरलेलं
तू होतीस तेव्हा आयुष्य होत ठरलेलं
जाताना तू मला दुःख देऊन गेलीस,
जाताना तू मला मदिरेत बुडवून गेलीस.

आता जगतोय आयुष्य उरलेलं
कुणी नाही कुणाच्या आयुष्याला पुरलेलं
आता दारुलाच मी जवळ केलंय,
माझं सारं दुःख मी या बाटलीतच बुडवलंय.

या नशेत मी माझाच नाही उरलोय
कळतं असूनही, नकळत खूप प्यालोय
आरसाही मला आज ओळखींनासा झालाय,
विचारतोय कोण हा बहुरूपी आलाय ?

असतीलही खूप जण दारूला जवळ करणारे
दुःखे आहेत प्रत्येकालाच आपापली
मीही त्यातलाच एक आहे मित्रांनो,
माझ्याकडेही आहेत माझी दुःखे जपलेली.

दारू हे औषध नाहीय, मला माहिताहे
जालीम उपाय हा नाहीय, हेही माहिताहे
पण काय करू, मित्रांनो पर्यायच नाही,
दारू सर्व काही विसरावयास लावताहे.

याचं नशेत मी तुला आजही बोलावतोय
याचं धुंदीत मी तुझी आठवणही काढतोय
तू तेव्हा होतीस माझी जीवाची राणी,
आज मी दारुलाच सांगतोय माझी सारी कहाणी.

आज माझी अवस्था बेभान आहे,
एका वेगळ्याच धुंदीत मी आहे !

आज माझी अवस्था बेभान आहे,
एका वेगळ्याच धुंदीत मी आहे !
ही अवस्था सुखाची आहे, कि दुःखाची ?
या साऱ्यांच्या पलीकडे मदिरेने मला नेलंय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2023-बुधवार.
=========================================