प्रेम कविता-गीत-तूच माझं प्रेम आहेस, तूच माझं सर्व काही आहेस !

Started by Atul Kaviraje, February 08, 2023, 06:03:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "क्यूंकि तुम ही हो, मेरी आशिक़ी अब तुम ही हो"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सायंकाळ-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(क्यूंकि तुम ही हो, मेरी आशिक़ी अब तुम ही हो)
----------------------------------------------------------

                   "तूच माझं प्रेम आहेस, तूच माझं सर्व काही आहेस !"
                  ----------------------------------------------

तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझं सर्व काही आहेस !

तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझं सर्व काही आहेस !
तुझ्या प्रेमात मी खुळा झालोय,
सगळीकडे मला तूच दिसत आहेस !

तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझं सर्व काही आहेस !
तुझ्या प्रेमाने मला दिवाणा केलंय,
पाहावं तिकडे तू आणि तूच आहेस !

तुझ्यावाचून मी राहू शकत नाही
तुझ्यावाचून माझं असणंच नाही
तू आहेस म्हणून मीही आहे,
अन्यथा माझं असण्याचं कारणंच नाही.

आपली मैत्री अशीच गाढ राहू दे
आपलं सख्य असंच अतूट राहू दे
जर नशिबाने आपणास वेगळे केले ?
अफसोस, असं नको कधी होऊ दे.

माझं जीवन तूच आहेस
माझं आयुष्यही तूच आहेस
माझं सुख-दुःख तूच आहेस,
माझी हसी-ख़ुशी पण तूच आहेस.

आपलं नातंच असं आहे प्रिये
वाटतं युगानुयुगे आपण भेटत आलोय
कधीच विभक्त न होणारे आपण,
एक प्रेमी युगुल होत आलोय.

दूर जायचं नावच घेऊ नकोस
मला ते नाही सहन होणार
तुझ्यासाठीच मी जगतोय रोज,
आपल्या प्रेमासाठी मी सर्व सहणार.   

माझा सारा वेळ तुझाच आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्याचसाठी आहे
माझा प्रत्येक श्वास तुझंच नाव घेतोय,
जगण्यासाठी तो मला एक कारण देतोय.

फक्त तुलाच पाहत आलोय मी आजवर
तुझंच नाव कोरलंय माझ्या मनावर
आज माझं मन तुझं झालंय,
बिनधास्त राज्य कर माझ्या मनावर.

माझं जगणं तुझ्यासाठी, मरणही तुझ्यासाठी
तुझी वफाई मी जाणतोय प्रिये
तिनेच तर आजवर मला सहारा दिलाय,
तिनेच माझ्या दुःखावर उतारा दिलाय.

माझं नशीबही तूच आहेस
माझी नियतीही तूच आहेस
मला घडवणारी तूच आहेस,
माझी प्रेम-देवता तूच आहेस.

तुजवीण मी अपूर्ण आहे
तुझ्यावाचून मी अधुरा आहे
मला पूर्णत्त्वाला नेणारी तू माझी,
पूर्णा आहेस, मधुरा आहेस.

तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझं सर्व काही आहेस !

तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझं सर्व काही आहेस !
तुझ्या प्रेमात मी खुळा झालोय,
सगळीकडे मला तूच दिसत आहेस !

तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझं सर्व काही आहेस !
तुझ्या प्रेमाने मला दिवाणा केलंय,
पाहावं तिकडे तू आणि तूच आहेस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2023-बुधवार.
=========================================