नसतेस घरी तू जेव्हा

Started by chetan (टाकाऊ), September 09, 2010, 10:51:43 AM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

काल श्रावण संपला तर अचानक मनात रावण शिरला आणि
कवी संदीप खरे यांच्या एका गाण्याचे विडंबन झाले माझ्या हातून ... चूक भूल माफ असावी पण हि मजा म्हणून वाचा बस्स......बाकी काही नको

गाण्याचे नाव :- नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन थम्स-अप ओतला जातो

ना अजून संपली RS
ना हवेत अजून गेलो
RUM ची बाटली खुणावते
मी थम्स-अप आणायला जातो
नसतेस घरी तू जेव्हा ...................................

चकली आणून ठेवतो
पापड भाजायला घेतो
चनाडाळीवरती  कांदा
आणि लिंबू मारून ठेवतो
नसतेस घरी तू जेव्हा ...................................

तू सांग आई मज आता
तू परत जाशील केव्हा????
मित्रांचे फोन येतात
अता परत पार्टी केव्हा ????

नसतेस घरी तू जेव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन थम- उप ओतला जातो




satishgarud

sarva bewadya tarfe kavi che hardik abhinandan....kavita khup chaan ahe....

NilamT