प्रेम कविता-गीत-माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय, प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय

Started by Atul Kaviraje, February 09, 2023, 12:15:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गयी है तुमसे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही गुरुवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गयी है तुमसे)
--------------------------------------------------------------

             "माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय, प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय !"
         ----------------------------------------------------------------

माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय,
प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय !

माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय,
प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय !
माझं हृदय तुला सांगतंय,
तुझ्यावरल्या प्रेमाचे प्रमाण देतंय !

माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय,
प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय !
ऐक माझ्या हृदयाची हाक,
तुझ्या प्रेमाची ते साक्ष देतंय !

थोडातरी विश्वास ठेव माझ्यावर
अविश्वास ठेवू नकोस माझ्या प्रेमावर
प्रेमाची अशी घेऊ नकोस परीक्षा,
ते नेहमी तुझंच प्रेम-गीत गातंय !

माझं चित्त कधी थाऱ्यावरच नसतं
इतकं तुझ्या प्रेमात ते पागल होतंय 
माझी बेचैनी तू समजून घे,
तुला पाहण्यास ते कसं व्याकुळ होतंय !

तुझ्या आग्रहाखातर मी काहीही करीन
तुझ्या प्रेमासाठी मी सर्वकाही करीन
चंद्र तुझ्या खिदमतीला हजर करीन,
ताऱ्यांची बिछायत तुझ्या पायांशी पसरीन.

या ढगांना बरसण्यास मजबूर करीन
या हवेचा रुख मी तुझ्याकडे वळवीन
तुझा एक एक शब्द मी झेलीन,
तुझ्या चेहऱ्यावर हास्य मी फुलवीन.

माझ्या डोळ्यांपुढे हा कोणता देखावा आहे ?
माझ्या मनात ही कोणती उलथ-पुलथ चाललीय ?
ही अशी कोणती जाणीव मला जाणवतेय ?
हे कोणते भास मला आज होतं आहेत ?

समुद्र इतका माझ्या जवळ आहे
तरी मी का तृषार्त आहे ?
नदी माझ्या समोरून वाहतेय,
तरी पाण्यासाठी मी का तरसत आहे ?

बघ  प्रिये, तुझ्याकरिताच मी हे सर्व करतोय
हे माझे सारे आयुष्य मी तुलाच वाहतोय
बस तू फक्त हो म्हण, प्रेमाला होकार दे,
मन फक्त तुझ्या होकाराला ग तरसतंय !

हवं तर तुझ्या पायांशी जग आणून ठेवीन
ही धरती, हे आकाश मी एक करीन
आता तरी तुझा मला होकार असेल ना,
आता तरी तू मला हो म्हणशील ना.

     प्रिया, का बरं तू मला त्रास देतोस ?
     इतकं तू का बरं मला प्रेमात छळतोस ?
     रोज रोज माझ्या स्वप्नांत येत राहतोस,
     माझ्या आठवणींना उजाळा देत राहतोस.

खरंय प्रिये, मी तुला घेऊनच जाणार इथून
तुझ्यावर प्रेमच करतोय मी तुला पहिल्यापासून
माझं प्रेम वृथा नाहीय, पाहशीलच तू,
माझं प्रेम खोट नाहीय, पडताळशीलच तू.

आता ये, उशीर नको करुस, सजणे
माझ्या मिठीत ये, आतुर बाहूत सामावून जा
तुझं मन अजूनही साशंक आहे का ?
तुझ्या मनाची घालमेल सुरु आहे का ?

मी जरी निघून गेलो, तरी वायदा करतोय
पुन्हा येईन परतून, जीव तुझ्यासाठीच झुरतोय
थोडा काळ वाट पाहीन मी तुझी प्रेमाखातर,
इतकं थांबलंय मन, सहेल थोडासातरी उशीर.

     प्रिया, मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवू ?
     मी तुझ्या नजरेत नजर कशी मिळवू ?
     अजुनी मनाची अवस्था दोलायमान आहे,
     अजुनी मन प्रेमात साशंक आहे.

     माझ्या हृदयाला मी कसं समजावू ?
     हृदयातील धडधड मी कशी थांबवू ?
     कसं तुला मी माझं मन देऊ ?
     कशी मी तुला माझं प्रेम देऊ ?

तुझ्यासारखीच प्रेम-तृष्णा माझी वाढत आहे
दोन्हीकडे आग बरोबर देहाला जाळत आहे
जरा समजून घे प्रिये, प्रेमात हे होणारच,
जरा समजून घे प्रिये, प्रेमात हे घडणारच.

सजणे, पहा ऋतू अंगडाई घेतोय
थंडीचा कसा सर्द फुलोरा फ़ुलतोय
कधी तप्त उन्हाळाही जाणवतोय,
तर कधी पावसातल्या वादळाचा संकेत देतोय.

मनानेही या ऋतूंबरोबर साझेदIरी केलीय
त्याबरोबर बेकरारीही वाढत चाललीय
माझी आकांक्षा, अतृप्तता असह्य होतेय,
आता तरी माझ्या इच्छांची कदर कर.

माझा जीव तुझ्यात गुंतलाय, प्रिये
माझा जीव तुझ्यात रमलाय, सखे
तो मला म्हणत राहिलाय सारखाच,
तुझ्यावरून जीव ओवाळून टाक आताच.

पहा ही रात्रही तुझ्यासाठी थांबलीय
अर्ध्यावरच ती थबकून उभी राहिलीय
गोष्ट अशी अर्ध्यावरच टाकून जाऊ नकोस,
पावलांना अशी घुटमळत ठेवू नकोस.

ये आता राहवत नाही, नयन माझे आतुरलेत
ये आता सहवत नाही, बाहू माझे पसरलेत
ये मिठीत सामावून जा, प्रेम वर्षाव करीत,
ये मनात सामावून जा, मनो-मिलन घडवीत.

प्रिये, या प्रेमाची खुमारी काही औरच आहे
ही मदहोशी होशच उडवीत आहे
शेवटी तुला माझे प्रेम समजलंय,
तुला तर माझे मनही कळलंय.

तुझ्या नजरेत मला प्रेम दिसू लागलंय
तुझ्या डोळ्यातून ते ओतप्रोत वाहू लागलंय
आता हे प्रेम असंच ठेव , प्रिये,
मला कधीही अंतर नको देऊस, सखये.   

आज माझी इच्छा फळाला आलीय
केव्हापासूनची तुझ्या प्राप्तीची आस होती
आज तुझं प्रेम मला मिळालं,
आज माझं हृदय तुझं झालं.

माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय,
प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय !

माझं हृदय तुझ्यासाठीच धडकतंय,
प्रत्येक ठोक्यात तुझंच नावं घेतंय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2023-गुरुवार.
=========================================