IIश्री गणेशाय नमःII-संकष्टी चतुर्थी-लंबोदर तू, वक्रतुंड तू, वरद-विनायका,हे गणेशI

Started by Atul Kaviraje, February 09, 2023, 09:52:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री गणेशाय नमः II
                                       "संकष्टी चतुर्थी"
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-09.02.2023-गुरुवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया श्रीगणेश गीत - "लंबोदर तू, वक्रतुंड तू, वरद-विनायका, हे गणेशा"

     हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचं अनोखं महत्व आहे. कोणतंही मंगल कार्य सुरु करताना श्रीगणेशाची पूजा सर्वात आधी केली जाते. श्रीगणेश बुद्धी आणि विवेकाचं प्रतिक आहेत. गणपती बाप्पा आपल्या भक्तांची सर्व विघ्नं दूर करतात म्हणून त्याला संकटमोचक किंवा विघ्नहर्ता असंही म्हणतात.

     यंदा मासिक संकष्टी चतुर्थी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी आहे.माघ महिन्यातली ही संकष्टी आहे. गुरुवारी येणाऱ्या या संकष्टीचा शुभ मुहूर्त ९ फेब्रुवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटं ते १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत आहे.

              संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी--

पूजा करणाऱ्याने सूर्योदयापूर्वी उठावे.
व्रत करणाऱ्या व्यक्तीने आंघोळ करुन स्वच्छ वस्त्र धारण केली पाहिजेत.
यावेळेस लाल किंवा पिवळी वस्त्र घालणं शुभ मानलं जातं, सोवळं असेल तर उत्तम.
त्यानंतर गणेशाची पूजा केली पाहिजे.
पूजा करणाऱ्याने आपलं तोंड पूर्व किंवा उत्तरेला ठेवावं.
गणरायांच्या मूर्तीला फुलांनी सजवावं.
पूजेसाठी तांब्याच्या कलशात हळद कूंकू आणि अक्षता घालाव्यात.
गणरायांना दुर्वा, फुलं (जास्वंद) उकडीचे मोदक अर्पण करावेत.
मग गणपती संकटनाशन स्तोत्राचा जाप करावा.

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.हिंदुस्थान टाइम्स.कॉम)
              ----------------------------------------------------

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी"- या सुप्रसिद्ध मराठी गाण्यावर आधारित गीत--
----------------------------------------------------------------------

                    "लंबोदर तू, वक्रतुंड तू, वरद-विनायका, हे गणेशा"
                   --------------------------------------------

लंबोदर तू, वक्रतुंड तू
वरद-विनायका हे गणेशा
तुझ्यापुढे नतमस्तक होऊनी,
तुज भजती जन सारे.

     विनायका तू, एकदंत तू
     गणपती बाप्पा मोरया
     तुझ्यापुढती नम्र होऊनी,
     तुज भजती जन सारे.

रिद्धी सिद्दीचा तू ईश्वर
अखिल जगाचा तू परमेश्वर
सकल विद्येचा ज्ञाता तुचि
समग्र बुद्धीचा दाता तुचि,
     तुझ्यापुढती लीन होऊनी,
     तुज भजती जन सारे.

     महेश उमेचा पुत्र धाकला
     अति गुणी तव कीर्ती धवलI
     प्रथम मान तुज पूजेचा
     संकटI तूची निवारी सकलI,
          तुझ्या गुणांचे गीत गाउनी,
          तुज भजती जन सारे.

दुर्वांकुर अति प्यारी तुजला
मोदक लाडू प्रसादाचा निवाला
तत्क्षणीच तू प्रसन्न होशी
लाडक्या भक्त गणाला,
     तुजपुढे पूज्य भाव घेउनी,
     तुज भजती जन सारे.

     अष्टविनायक तू महाराष्ट्राचा
     स्थान तुझे रे मनातले
     अनेक नामे तुला पूजुनी
     भक्त ते सकल आनंदले,
          तुझेच नाम मुखाने वदूनी,
          तुज भजती जन सारे.

क्षमा, अपराध घालून पोटी
आम्हा पामरांचा तू कैवारी
तुझ्या दर्शनI, तुज पाहण्या
आलो मी तुझिया द्वारी,
     तुझ्या नामाचा मंत्र जपुनी,
     तुज भजती जन सारे.

     कृपाळू तू, कनवाळू तू
     दयाळू तू, आशिष दे मज तू
     पापे सारी पोटी घालुनी
     मम् शिरी वरदहस्त ठेव तू,
          तुझ्या दर्शने पावन होऊनी,
          तुज भजती जन सारे. 
     
लंबोदर तू, वक्रतुंड तू
वरद-विनायका हे गणेशा
तुझ्यापुढे नतमस्तक होऊनी,
तुज भजती जन सारे.

     विनायका तू, एकदंत तू
     गणपती बाप्पा मोरया
     तुझ्यापुढती नम्र होऊनी,
     तुज भजती जन सारे.
     
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2023-गुरुवार.
=========================================