मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-206

Started by Atul Kaviraje, February 09, 2023, 10:09:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                    चारोळी क्रमांक-206
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  प्रेमाची  आणि  एक  चारोळी  आपल्यापुढे  पेश  करीत  आहे . तो  म्हणतोय , कधी  कधी  पहाटे  झोपेतून  उठावसच  वाटत  नाही . पण  ज्या  व्यक्तीवर  आपले  प्रेम  असतं , अश्या  व्यक्तीसाठी  म्हणजे  आपल्या  प्रेयसीसाठी  सकाळी  उठण्याची  इच्छा  होते , ते  खरं  प्रेम  असतं . कधी  कधी  देवळात  गेल्यावर  देवाचे  दर्शन  घ्यावंसं  वाटतं . आणि  अश्या  वेळी  ती  सोबत  असते , जवळ  असते , तेव्हाचं  प्रेम  हे  खरं  प्रेम  असतं . कधी  कधी  प्रेमात  गोड  भांडण , वाद  हे  होतंच  असतात . जेव्हा  भांडल्यावर  मनाला  खूप  यातना , वेदना  होतात , जी  रुखरुख  लागते , तेच  खरं  प्रेम  असतं . तिने  केव्हातरी  मोबाईलवर  मेसेजेस  केले  असता,  ते  वाचता  वाचता , त्याच्या  चेहऱ्यावर  येणारे  हास्य , स्माईल  हेही  तर  एक  प्रेमच  आहे .

=====================
💝 "जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्यावर..
चेहऱ्यावर येणारी Smile हे प्रेम आहे." 💘
=====================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.02.2023-गुरुवार.
=========================================