मी सांगतो काय होता एक घर करताना..

Started by nphargude, February 10, 2023, 01:35:09 PM

Previous topic - Next topic

nphargude

मी सांगतो काय होतं एक घर करताना...
आयुष्य निघून जात चार भिंती उभा करताना...

स्वप्न विरतात भिंती रंगवताना...
डोळे ओले होतात गच्चीतून आपल्या वाटणीचे आकाश निरखून पाहताना...

मन हि भरून येत पाहुण्यांना हक्काने घरी बोलावतात...
मी सांगतो काय होतं एक घर करताना..

हप्त्याच्या गणितात स्वप्न बाजूला ठेवताना...
कसरत करावी लागते इतर गरज पूर्ण करताना...

जीवाची धाकधूक होत राहते.. घर उभे राहताना...
तसेच सुखाचे चार दिवस निघून जातात आपल्या घरात राहताना...

मी सांगतो काय होतं एक घर करताना...