मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-208

Started by Atul Kaviraje, February 11, 2023, 10:28:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                 चारोळी क्रमांक-208
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     नवं-चारोळीकार  आपणापुढे  आणि  एक  प्रेमाची  चारोळी  घेऊन  येत  आहे . त्याच्या  चारोळीतील  प्रियकर  आपल्या  प्रेयसीस  लाडिकपणाने  काही  सांगत  आहे . तो  तिला  म्हणतोय , प्रिये , तू  म्हणजे  तूच  आहेस , आणि  मी  फक्त  तुझाच  आहे . जन्मभर  आपली  एकमेकांशी  ही  अशीच  साथ  असेल , आणि  तीच  तर  आपल्या  प्रेमाची  हमी  असेल . म्हणून  तू  मला  नेहमीच  हसतमुख  अशी  दिसावीस . मला  तुझे  रागावणे , रुसणे  बिल्कुलही  चालणार  नाही . मग  मलाही  तुझा  राग  येऊन  मी  तुझ्यावर  प्रेम  करायचं  सोडून  देईन . तुझ्या  गुलाबी  गालांवर  प्रेमाने  माझ्या  ओठाने  स्पर्श  देखील  मी  करणार  नाही . तुझ्यावरले  प्रेमही  मी  व्यक्त  करणार  नाही .

==============
💝 "तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.💘
==============

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक- 11.02.2023-शनिवार.
=========================================