प्रेम कविता-गीत-तू म्हणशील ते करीन मी, तुला आवडेल तेच करीन मी !

Started by Atul Kaviraje, February 12, 2023, 12:37:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "तू ही ये मुझको बता दे, चाहूँ मैं या ना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रविवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(तू ही ये मुझको बता दे, चाहूँ मैं या ना)
-------------------------------------------------

                 "तू म्हणशील ते करीन मी, तुला आवडेल तेच करीन मी !"
                --------------------------------------------------

तू म्हणशील ते करीन मी,
तुला आवडेल तेच करीन मी !

तू म्हणशील ते करीन मी,
तुला आवडेल तेच करीन मी !
मग मला पटो ना पटो,
मला आवडो ना आवडो.

तू म्हणशील ते करीन मी,
तुला आवडेल तेच करीन मी !
तुझ्यावर माझा बस नाही,
तुझ्यावर माझा काहीच जोर नाही.

आता माझं मन मला म्हणतंय
बस झाली तुझी मुजोरी, बरजोरी
ऐक आता तुझ्या प्रियेचे म्हणणे,
वेड्या, तुझं दिल केलंय तिने चोरी.

माझ्या मनाचं मी ऐकतोय आजकाल
आता माझी स्वतःची काहीच नाही चIहत
माझ्या आवडी निवडी आता तुझ्याच आहेत,
माझ्या सवयीही आता तुझ्याच हाती आहेत.

माझं मन म्हणतंय, भेट तिला एकदातरी
अरे, तीच तर आहे तुझी स्वप्नसुंदरी
हळूहळू मला मनाचं पटू लागलंय,
मला तुला भेटावसं वाटू लागलंय.

माझ्यासोबत हे प्रथमच घडतंय
माझ्यासोबत हे आतास काय घडतंय ?
माझं मन नाहीच माझ्या काबूत,
ते तुला पाहण्यासाठी उतावीळ होतंय !

यापूर्वी माझा काहीच प्रयत्न नव्हता
यापूर्वी मी असा विचारच केला नव्हता
यापूर्वी मी कुणालाही भेटत नव्हतो,
यापूर्वी मी कुणाला विचारतही नव्हतो.

आता हा बदल कसा घडला माझ्यात ?
कोण येऊ पाहतय माझ्या जीवनात ?
हे कोड तूच सोडवू शकशील,
ही उलझन तूच सुलझवु शकशील.

जेव्हा तुझ्याशी नजरIनजर होईल माझी
जेव्हा भेट होईल तुझी अन माझी
तेव्हा प्रश्नाची उत्तरे मिळतील आपोआपच,
तुझ्याशी संवाद साधणंही जाईल सोपचं.

     नाहीत माझी स्वप्ने मोठी, प्रिया
     छोट्या छोट्या स्वप्नांनी सजलीय माझी जिंदगी
     या माझ्या जीवनात तू गीत बनून आलास,
     माझ्या जीवनाचा मनमित होऊन आलास.

     माझ्या जीवनात तू बहर आणलीस
     माझ्या आयुष्यात तू प्रीत आणलीस
     तुझे स्वप्नही राहिले होते दूर,
     तेवढ्यात तुझी जवळीकही साधली.

     आज पंख लावून उडतोय माझा आनंद
     मनही होऊ लागलंय माझं स्वच्छंद
     पहा, ते कसं बोलू लागलंय, डोलू लागलंय,
     ओठांतून माझ्या ते व्यक्त होऊ लागलंय.

     आजवर मी एकाकी होते, उदास होते
     आशा निराशेच्या झुल्यावर झुलत होते
     तू माझ्या आशा पल्लवित केल्यास,
     विश्वासाने तू त्या प्रफुल्लित केल्यास.

     माझ्यावरही माझा इतका नव्हता भरोसा
     तू येऊन दिलंIस मला आपलासा दिलासा
     आज मनाला तुझीच ओढ आहे,
     माझ्या आयुष्याला आलेला हा एक वेगळाच मोड आहे.

     कळलंच नाही, मी तुझ्यावर प्रेम करू लागले
     नाही समजलं, केव्हा तुला मी मन देऊ केले
     सारी स्वप्न होताहेत पूर्ण माझ्या नकळतच,
     ही जादू प्रेमाची का, प्रश्न केला मी मनातच ?

     तुला मी हे कधीच नाही विचारणार
     तुला मी आता कधीच नाही विसरणार
     मला जागवू नकोस, स्वप्नांतच राहू दे, प्रिया,
     जीवनभर हे स्वप्न असेच राहू दे !

     मला जागवू नकोस, स्वप्नांतच राहू दे, प्रिया
     जीवनभर हे स्वप्न असेच राहू दे !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2023-रविवार.
=========================================