मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-210

Started by Atul Kaviraje, February 13, 2023, 10:22:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-210
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --आज  नवं-चारोळीकार , आठवणींच्या  राज्यात  आपल्याला  या  चारोळीतून  घेऊन  जात  आहे . तो  म्हणतोय , या  आठवणी  अश्या  असतात , की  त्या  कधी  येतील  याचा  काहीच  नेम  नसतो . या  आठवणी  क्षणाक्षणाला  येतंच  असतात . त्या   येतात  अन  निघूनही  जातात . या  आठवणींना  काही  कळतं  का  ? तर  त्यांना  काहीच  कळतं  नसतं . त्या  येऊन  कधी  मनाला  त्रास  देऊन  जातात , तर  कधी  छळवाद  मांडतात . कधी  मृदुल  होऊन  फुलांच्या  पाकळ्यांगत  गळून  पडतात , तर  कधी  फुलांप्रमाणे  फुलतात . या  आठवणी  अश्या  का  वागतात , याचे  उत्तर  आजही  कुणालाही  मिळू  शकलेले  नाही . कधी  त्या सुख  देऊन  जातात , सुखद  क्षणांत  त्या  चमकून  जातात , तर  कधी  त्या  दुःखांना  उजाळा  देऊन  अश्रूंच्या  धारांवाटे  वाहत  राहतात . खरोखरच   या  आठवणी  गूढ , अनाकलनीय  अश्याच  असतात . 

===================
💝 "क्षणोक्षणी आठवण येते अन जाते..
या आठवणिला तरी काही कळते,
कधी त्रास देते तर कधी छळते..
कधी पाकळ्यांप् रमाणे गळते,
तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते..
ही आठवण अशी का वागते,
जणू सुखद क्षणांमधून चमकते..
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते."💘
===================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2023-सोमवार.
=========================================