मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-123-माझा देश भारत

Started by Atul Kaviraje, February 13, 2023, 10:37:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-123
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा देश भारत"

     मित्रानो आपला देश भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे. एकेकाळी भारत हा विश्वगुरू होता, आपल्या देशात प्राचीन काळात मोठमोठे साधू संत होऊन गेलेत.

     आजच्या लेखात आपण Maza desh nibandh मिळणार आहोत. याला तुम्ही माझा देश भारत  किंवा भारत माझा देश निबंध म्हणूनही वापरू शकतात. तर चला सुरू करूया..

     माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारत हा एक विशाल देश आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतान्त्रिक देश आहे म्हणजेच भारतात सत्ता ही जनतेच्या हातात आहे. जनतेद्वारे निवडलेले प्रतिनिधी देश चालवतात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात कोणत्याही धर्माचे लोक राहू शकतात. आपल्या देशात सर्वांना समान अधिकार आहे.

     भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. हा पर्वत खूप विशाल व उंच आहे. हिमालयातून भारतातील बऱ्याच नद्या उगम पावतात. आपल्या देशात गंगा, यमुना, तापी, गोदावरी, नर्मदा ई अनेक नद्या वाहतात. पण भारतात गंगेच्या पाण्याला खूप महत्त्व आहे. गंगा भारतीय संस्कृतीत सर्वात पवित्र मानली जाते. भारतात अनेक प्रदेश आहेत. जेथे वेगवेगळया जाती धर्माचे लोक राहतात. पंजाब प्रदेशात शीख लोक राहतात, अनेक राज्यांमध्ये मुस्लिम लोक बहुसंख्य आहेत. भारतात प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा ही बदलत जाते. मराठी, नेपाळी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली, हिंदी, काश्मिरी, मणिपुरी, उडिया यासारख्या 20 पेक्षा जास्त प्रमुख भाषा भारतात बोलल्या जातात.

     भारताचा इतिहास सुद्धा अतिशय प्राचीन आहे. भारतावर आधुनिक व मध्ययुगीन काळात अनेक विदेशी शासकांनी आक्रमण देखील केले. पूर्वी भारत 'सोन्याची चिमणी' म्हणून ओळखला जायचा. पण मुघल आणि इंग्रजांनी भारतात मोठ्या प्रमाणात लूट केली. पण तरीही आज भारत जगातील राजनीतित आपले उच्च स्थान मिळवून आहे. भारताची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. चहुमुखी प्रगती मुळे भारत आज आशियामध्ये महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करीत आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2023-सोमवार.
=========================================