प्रेमाच्या दुर्गम रस्त्याची कविता-प्रेमी होणं सोपं नाहीय, प्रेम करणं सोपं नाहीय

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:21:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेमाच्या दुर्गम रस्त्याची कविता-गीत ऐकवितो. "आसान नहीं यहाँ आशिक़ हो जाना, पलकों पे काँटों को सजाना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही मंगळवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(आसान नहीं यहाँ आशिक़ हो जाना, पलकों पे काँटों को सजाना)
-----------------------------------------------------------------------

                      "प्रेमी होणं सोपं नाहीय, प्रेम करणं सोपं नाहीय !"
                     -------------------------------------------

प्रेमी होणं सोपं नाहीय,
प्रेम करणं सोपं नाहीय !

प्रेमी होणं सोपं नाहीय,
प्रेम करणं सोपं नाहीय !
हा मार्ग भरलाय काट्याकुट्यानी,
हा रस्ता साचलाय खाचखळग्यांनी !

प्रेमी होणं सोपं नाहीय,
प्रेम करणं सोपं नाहीय !
दुःखच भेट दिलंय माझ्या नशिबाने,
या दुःखालाच आपलंस केलंय मनाने.

या दुःखाचा मी मान ठेवलाय
जणू मला खजिनाच लाभलाय
साऱ्यांनाच दुर्लभ ही बहुमूल्य भेट,
मला दुःखाचा आहेर मिळालाय.

इथे शब्दांचे मोल ठरत नाही
इथे वायदे फोलच ठरत आहेत
असा भडकलेला वडवानलच आहे हा,
ज्वाळा पसरवणारी एक चिंगारीच आहे ही.

एक न विझणारी ही आग आहे
जितकी विझवाल तितकी जास्त पसरते
जरा तुही यातून जाऊन बघ,
जरा तुही थोडा अनुभव घेऊन बघ.

प्रेमात फक्त सुखच उपभोगू नकोस
प्रेमात फक्त देहाची आसक्ती ठेवू नकोस
थोडंसं जरा अलिप्त होऊन बघ,
थोडीशी जरा वेगळी होऊन बघ.

तुझ्या मनात तू डोकावून पहा
तुझ्या आत्म्यास तू विचारून पहा
मग तुला प्रेम म्हणजे काय ते कळेल,
मग तुला दुःख म्हणजे काय ते उमजेल.

ही आशिकी नाहीय सोपी, प्रिये
प्रेम करणं तितकंच कठीण आहे,
या अशिकलाच तू विचारून पहा,
त्याचे आजवरले अनुभव पडताळून पहा.

प्रेमी होणं सोपं नाहीय,
प्रेम करणं सोपं नाहीय !

प्रेमी होणं सोपं नाहीय,
प्रेम करणं सोपं नाहीय !
हा मार्ग भरलाय काट्याकुट्यानी,
हा रस्ता साचलाय खाचखळग्यांनी !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================