सह्याद्री : अस्मिता

Started by madhura, September 09, 2010, 10:45:05 PM

Previous topic - Next topic

madhura

सावलीही अशात हसते
ठावठिकाणा माझा पुसते
मीच मला मग शोधत बसते

बोल मला तू हळुवार काही
सांग भले तू माझा नाही
कलीयुगातली मी मीराबाई

मौनातले हे शब्द बोलके
तुझ्या नि माझ्या ओठी हलके
असुनि नयनी अश्रू पोरके

क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....

जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती
होती सच्ची माझी प्रीति

क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....


गीत    -    अशोक पत्की
संगीत    -    अशोक पत्की
स्वर    -    आरती अंकलीकर-टिकेकर,  त्यागराज खाडीलकर
       (शीर्षक गीत, मालिका: अस्मिता, वाहिनी: सह्याद्री)