प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं, प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:26:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला आजच्या १४ फेब्रुवारीच्या प्रेम दिवसावर, एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से, हर ग़म से, बेगाना होता है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही मंगळवार-दुपार प्रेममय होवो , ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से, हर ग़म से, बेगाना होता है)
----------------------------------------------------------------------

   "प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं, प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !"
  ----------------------------------------------------------------------

प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं,
प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !

प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं,
प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !
प्रेम दीवान असतं, प्रेम मस्तान असतं,
प्रेम नादान असतं, प्रेम अनजान असतं !

प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं,
प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !
सुख दुःखापासून ते अलग असतं,
साऱ्या भावनांपासून ते विलग असतं !

प्रेम जणू पतंगा असतं
ज्योतीवरती झोकून देत असतं
मरणाची पर्वा नाही करीत ते,
जळून खाक होत असतं.

त्या ज्योतीचं पतंगा ऐकत नाही
तिच्यावरच तो आसक्त होई
माझं जीवन थोडंच आहे, ती म्हणतेय,
मलाही राख व्हायचय, ती समजIवतेय.   

पतंगा विचाराच्या परेच असतो
तो तिच्या समवेतच असतो
अंती दोघांचे मिलन होतं,
शेवटी दोघांचं मरणच ओढवत.

या प्रेमातून कुणी सुटला नाही
प्रेमाच्या कटाक्षाने तो बांधला जाई
प्रेम-नजर कुणीच चुकवू शकला नाही,
मनाविरुद्ध कोण कसा बरं जाई ?

शेवटी प्रेम हे प्रेमचं असतं
नाही म्हटलं तरी होतंच असतं
शेवटी मन हे मनचं असतं,
ते दुसऱ्याचं होतंच असतं.

कितीही नाकारलं तरी ते डोळ्यांत दिसतं
कितीही लपवलं तरी ते निःशब्दच कळतं
ते रुसण्यात दिसतं, ते हसण्यात दिसतं,
ते उन्हात चमकत, ते चांदण्यात प्रकाशत.

कुण्या शायरने म्हटलंच आहे
कितीही छुपवल तरी ते बाहेर पडत
जणू मद्याचा भरलेला प्याला,
ओसंडत राहतो, छलकत राहतो.

प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं,
प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !

प्रेम बिनधास्त असतं, प्रेम निर्धास्त असतं,
प्रेम मस्त असतं, प्रेम मदमस्त असतं !
प्रेम दीवान असतं, प्रेम मस्तान असतं,
प्रेम नादान असतं, प्रेम अनजान असतं !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================