व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस-कविता-2-प्रेम

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:30:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस"
                              -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार आहे. "व्हॅलेन्टाईन्स डे" हा "प्रेम दिवस" म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मराठी बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस प्रेम-दिनाच्या अनेक हार्दिक आणि प्रेम शुभेच्छा. वाचूया प्रेमावर काही कविता.

                                          "प्रेम"
                                         -------

प्रेम प्रेम रूप आहे, प्रेम हे सगुण ।

प्रेम प्रेम दुःख आहे, प्रेम हेचि सुख ।।


प्रेम प्रेम छंद आहे, प्रेम हेचि मंद ।

प्रेम प्रेम गंध आहे, प्रेम हे सुगंध ।।


प्रेम प्रेम स्वप्न आहे, प्रेम हेचि सत्य ।

प्रेम प्रेम यवन आहे, प्रेम हेचि मन ।।


प्रेम प्रेम प्रीत आहे, प्रेम हेचि मीत ।

प्रेम प्रेम गीत आहे, प्रेम हे संगीत ।।


प्रेम प्रेम भास आहे, प्रेमाचाच ध्यास ।

प्रेम प्रेम घात आहे, प्रेम हा विश्वास ।।


प्रेम प्रेम माझे आहे, प्रेम हे तुझ्यात ।

प्रेम प्रेम सर्व आहे, प्रेम हे जगात ।।


प्रेम प्रेम आहे माया, प्रेम हीच छाया ।

प्रेम कधी करुनि पहा, कळेल प्रेमाची काया ।।

--नवकवी
----------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================