व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:41:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार आहे. "व्हॅलेन्टाईन्स डे" हा "प्रेम दिवस" म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मराठी बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस प्रेम-दिनाच्या अनेक हार्दिक आणि प्रेम शुभेच्छा. वाचूया प्रेमाच्या काही शुभेच्छा. .

--एक थेंब अळवावरचा, मोत्याचं रुप घेउन मिरवतो. एक थेंब तुझ्या ओठांवरचा माझं जग मोत्यांनी सजवतो.

--पडता कानी तुझ्या बासरीचे सुर हरपला जीव, धडधडला उर का भासे मज तु कोसों दुर वाहशी जरी होउनी डोळ्यांतला पुर !

--घेता जवळी तु मला, पारिजात बरसत राहतो. हळव्या क्षणांच्या कळ्या, देहावर फुलवत राहतो!

--नेहमी तुला विसरायचं ठरवुन नेहमी तुला आठवत राहते स्व:ताला कधी विसरता येतं का? उमगुन मग स्वःतावर हसत राहते!

--तु नसतेस तेव्हा, चांदण्याही काळोखात हरवलेल्या असतात. चंद्राचं वेड नाही मला, फक्त तु असावी शेजारी जेव्हा तारे वाट चुकतात.

--एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या आणि घे डोळे मिटुन बघ कळतयं का तुला की, तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !

--रात्री चंद्र असा सजला होता तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.

--तुझी वाट बघून थकलेल्या, डोळ्यांना आता निजवतो आहे. तुझ्या माझ्या भेटीसाठी, स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

--रात्र अशी बहरुन जाते चांदण्यांचा सडा शिंपताना स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे अंगणातला पारिजात वेचताना

--आता पुरे झालं रे तुझं असं मला शब्दांनी छ्ळणं. सलत नाही का तुला कधी माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================