व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 12:43:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार आहे. "व्हॅलेन्टाईन्स डे" हा "प्रेम दिवस" म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मराठी बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस प्रेम-दिनाच्या अनेक हार्दिक आणि प्रेम शुभेच्छा. वाचूया प्रेमाच्या काही शुभेच्छा. .

--तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!! Happy Valentines Day!

--दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentines Day!

--पाऊस म्हटलं की मला आठवते तुझ्या उरातली धडधड माझ्या आधाराशिवाय झालेलं तुला पाऊल टाकणं अवघड... हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

--पाहशील जिथे जिथे नजर उचलून... मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.... तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!! Happy Valentines Day!

--तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!! हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

--खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात...
Happy Valentine Day

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================