१४-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 10:17:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                 "१४-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                -----------------------

-: दिनविशेष :-
१४ फेब्रुवारी
व्हॅलेंटाइन्स डे
St. Valentine's Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००३
नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड
२०००
अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
१९८९
भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.
१९८९
ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीची हत्या करण्याचा फतवा काढला.
१८८१
भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना
१९६३
अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
१९४६
पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९४५
दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.
१९४५
चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१८९९
अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
१८७६
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५०
कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री
१९३३
मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ - मुंबई)
१९२५
मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते
(मृत्यू: १४ आक्टोबर २०१३)
१९१६
संजीवनी मराठे – कवयित्री
(मृत्यू: १ एप्रिल २०००)
१९१४
जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार
(मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६)
१४८३
बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक
(मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९७५
पी. जी. वूडहाऊस
१९३० मधील छायाचित्र
पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक
(जन्म: १५ आक्टोबर १८८१)
१९७५
ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
(जन्म: २२ जून १८८७)
१९७४
श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू
(जन्म: १ जानेवारी १९००)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================